शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे प्रशासकीय यंत्रणेवर पडतोय ताण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:31 IST

बुलडाणा : राज्यातील महसूल विभागांतर्गत पदपुनर्रचनेसंदर्भात  दोन वर्षांपूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल  अद्याप प्राप्त झालेला नसतानाच जिल्हाधिकारी कार्यालय तथा  महसूल शाखेंतर्गत जिल्ह्यात जवळपास ११८ अधिकारी,  कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागांतर्गत ११८ पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्यातील महसूल विभागांतर्गत पदपुनर्रचनेसंदर्भात  दोन वर्षांपूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल  अद्याप प्राप्त झालेला नसतानाच जिल्हाधिकारी कार्यालय तथा  महसूल शाखेंतर्गत जिल्ह्यात जवळपास ११८ अधिकारी,  कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.  मुख्यमंत्र्यांच्या रद्द झालेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने  प्रशासकीय पातळीवर घेण्यात आलेल्या आढाव्या दरम्यान ही  बाब समोर आली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांच्या वॉररुम अंतर्गत समाविष्ठ  असलेल्या जिगाव प्रकल्पासह अन्य काही प्रकल्पांचा असलेला  समावेश, राष्ट्रीय महामार्गासाठी कराव्या लागणार्‍या भूसंपादनाचा  विषय, नैसर्गिक आपत्तीचे बदलते स्वरूप यामुळे तहसील स् तरावर वाढलेला कामाचा ताण, अनुदान स्वरुपात शासनाकडून  मिळणारा निधी वाटपाचा ताण या सर्व कामांचा ताण पाहता  जिल्ह्यात रिक्तपदांची समस्या महसुली यंत्रणेला भेडसावत आहे,  त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये प्राधान्याने  रिक्तपदाच्या विषयाची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी  कार्यालयाकडून मागवली होती; मात्र तांत्रिक अडचणीमुळे  अमरावतीला गेल्या आठवड्यात होणारी ही बैठक पुढे  ढकलण्यात आली होती. त्यामुळे प्रशासनावरील ताण वाढला  आहे.

अधिकार्‍यांचा अनुशेषजिल्हाधिकार्‍यानंतर जिल्ह्याचा डोलारा सांभाळणारे अपर  जिल्हाधिकारी पदच बुलडाण्यात रिक्त आहे. या व्यतिरिक्त १४  उपजिल्हाधिकार्‍यांची जिल्ह्याला गरज असताना १२ उ पजिल्हाधिकारी कार्यरत आहेत. तहसीलदारांचीही १८ पैकी चार  पदे रिक्त असून, ७0 पैकी तीन नायब तहसीलदारांची पदे भरणे  आवश्यक आहे.