शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दप्तराच्या ओझ्यापासून विद्यार्थ्यांंना मुक्ती

By admin | Updated: August 27, 2016 03:01 IST

बुलडाणा जिल्ह्यातील दुधा येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रम.

ओमप्रकाश देवकर हिवरा आङ्म्रम(जि. बुलडाणा), दि. २६ : दुधा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शिक्षकांनी प्रत्यक्षपणे शासन निर्णयाची अंमलबजावणी करीत विद्यार्थ्यांंना पाठीवरील दप्तराचे ओझ्यापासून मुक्ती देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांंच्या जुन्या पुस्तकांची व्यवस्थित बांधणी करून विषयानुसार मांडणी करून शाळेमध्ये ठेवण्यात आली आहेत.शाळेतील अध्यापनाच्या वेळेस ही पुस्तके विषयानुरुप विद्यार्थ्यांंंना वितरीत करण्यात येतात. शासनाकडून प्राप्त झालेली नवीन पाठय़पुस्तकांचा वापर विद्यार्थी घरीच करतात. शाळेत येताना पाठय़पुस्तके आणण्याचे कामच नसते. फक्त सोबत वही, पेन, पेन्सिल घेऊनच शाळेत विद्यार्थी येतात. म्हणजे शाळेतील पुस्तके शाळेत व घरची पुस्तके घरी यामुळे दप्तराचे ओझे शून्याकडे नेण्यास मदत होत आहे.मेहकर तालुक्यातील विवेकानंद नगर केंद्रातील दुधा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत मुख्याध्यापक गजानन इंगळे, सह अध्यापक गजानन दाभाडे, राजकुमार सवडतकर कार्यरत आहेत. कमी ओझ्याच्या दप्तरामुळे विद्यार्थी खूश झाले. त्यांनाही ही संकल्पना आवडली. विद्यार्थ्यांंंनीही याला भरपूर प्रतिसाद दिला. या संकल्पनेमुळे शाळेची उपस्थिती पटसंख्या वाढून ती कायम राहू लागली. दप्तर नाही म्हणून काहीही करा, अशी सुट न देता विद्यार्थ्यांंंना एक आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न या नव्या संकल्पनेतून राबविण्याचा प्रयत्न हे शिक्षक करीत आहेत. सह अध्यापक गजानन दाभाडे यांनी गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक गजानन इंगळे, सह अध्यापक राजकुमार सवडतकर यांच्या मदतीने शाळेतच दप्तराचे ओझे कमी करण्याची संकल्पना राबविली.