शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत टॉवरग्रस्त शेतकऱ्यांनी मोबदल्यासाठी अर्ज दाखल करावे : टॉवर विरोधी कृती समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 14:24 IST

बुलडाणा : ३१ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त  शेतकऱ्यांनी  संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसिलदार यांचेकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्र चे अध्यक्ष मिलिंद पाटील व अनिल नागरे यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये सन २००८ पासून ४०० के.व्ही. व ...

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्यामध्ये सन २००८ पासून ४०० के.व्ही. व त्यापुढील विद्युत लाईनची कामे सुरू झाली. राज्यात एकूण १ लाख ५० हजार टॉवर असून २ टॉवर मधील अंतर १ हजार फुट आहे. राज्यात एकूण ७ ते ८ लाख शेतकºयांना याचा फटका बसलेला आहे.

बुलडाणा : ३१ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त  शेतकऱ्यांनी  संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसिलदार यांचेकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्र चे अध्यक्ष मिलिंद पाटील व अनिल नागरे यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये सन २००८ पासून ४०० के.व्ही. व त्यापुढील विद्युत लाईनची कामे सुरू झाली, ही कामे करताना शेतकºयांना नुकसानीचा योग्य मोबदला दिला जात नव्हता. यासाठी टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील व सरचिटणीस अनिल नागरे यांनी संपूर्ण राज्यात विद्युत टॉवरग्रस्त शेतकºयांना मोबदला मिळावा यासाठी आंदोलने केली. उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात मंत्रालयात जवळपास ४० बैठका घेतल्या आणि महाराष्ट्र  शासनाने ३१ मे २०१७ रोजी जाहीर केले असून राज्यातील ६६ के.व्ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्चदाब पारेषण वाहिनीच्या व्याप्त जागेच्या मोबदल्यात वाढ करण्याबाबत व वाहिनीच्या तारेखालील जमीनीचा मोबदला देणे बाबतचे धोरण तयार केले आहे. त्यानुसार सदर अर्ज विद्युत टॉवरग्रस्त व विद्युत टॉवरच्या तारेखालील आलेल्या जमीनीच्या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी अर्ज करावयाचा आहे. चंद्रपूर, नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, औंरगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, सोलापूर, अहमदनगर, धुळे, जळगाव या जिल्ह्यातून जास्त टॉवर गेले असून राज्यात एकूण १ लाख ५० हजार टॉवर असून २ टॉवर मधील अंतर १ हजार फुट आहे. या २ टॉवरमध्ये ५/७ शेतकºयांच्या शेतावरून विद्युत तार जाते. राज्यात एकूण ७ ते ८ लाख शेतकºयांना याचा फटका बसलेला आहे.विद्युत टॉवरखाली आलेल्या जमीनीचे क्षेत्र मोजून त्या क्षेत्राच्या दीडपट करून तसेच जमीनीचा त्या भागातील रेडीरेकनरचा दर दुप्पट करून मोबदला द्यायचा आहे. यापुर्वी विद्युत टॉवरग्रस्त टॉवरग्रस्त शेतकºयांना जो मोबदला देण्यात आला, तो मोबदला पिकाच्या नुकसानीचा असून जी कंपनी संबंधीत काम करीत आहे, त्यांनी दिलेला आहे. त्यांनी जमीनीचे मुल्यांकन काढून नुकसानीचा मोबदला दिलेला नाही. तसेच विद्युत टॉवरग्रस्त शेतकºयांच्या ७/१२ वर टॉवरची नोंद घेतलेली नाही आता टॉवरची नोंद ७/१२ वर घेणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे संबंधीत अधिकाºयांनी टॉवरची नोंद त्वरीत करावी, तसेच ३१ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकºयांना नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त शेतकºयांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसिलदार यांचेकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती समिती,महाराष्ट्र चे अध्यक्ष मिलिंद पाटील व अनिल नागरे यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण