शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

शासकीय कार्यालयात विजेचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:37 IST

ग्रामीण भागात भारनियमन : कर्मचाऱ्यांऐवजी रिकाम्या खुर्च्या घेतात हवा, प्रकाश

बुलडाणा : विजेचा तुटवडा लक्षात घेता, शहरात काही भागात अघोषित भारनियमन सुरू आहे. शिवाय वीज बचतीच्या उपाययोजना शासनाकडून आखल्या आहेत. मात्र, असे असतानाही शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये विजेचा गैरवापर होत असून, कर्मचाऱ्यांऐवजी रिकाम्या खुर्च्या व दस्तावेज हवा व प्रकाश घेत असल्याची बाब ‘लोकमत’ने आज जागतिक ऊर्जादिनी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून पुढे आली.विजेचा अनावश्यक वापर टाळा, विजेची बचत करा, असा संदेश शासनाकडून वारंवार दिला जात असतानाही शासकीय कार्यालयातील वीज वापरावर मात्र कोणताही बदल दिसून येत नाही. विजेची बचत व्हावी, यासाठी शासनाने गावोगावी सीएफएल बल्बचा वापर आणि सौर उर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने योजना राबविल्या जात आहेत; मात्र, गावोगावी योजना राबविणाऱ्या जिल्हा यंत्रणेकडूनच विजेचा गैरवापर होताना दिसत आहे. यासंदर्भात आज शहरात असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, प्रशासकीय इमारत आदी ठिकाणी पाहणी करण्यात आली. सर्वच कार्यालयात व बाहेर व्हरांड्यात ४० वॅटच्या ट्युबलाइटचा वापर आढळून आला. लख्ख उजेड असलेल्या ठिकाणी ट्युब लाइट बसविण्यात आले आहेत आणि ते दिवस-रात्र सुरू ठेवण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त कर्मचारी जागेवर नसतानाही पंखे गरगरताना दिसून आले. काही कार्यालयांमध्ये तर दोन-तीन कर्मचारी काम करताना दिसतात आणि सर्व पंखे व ट्युबलाइट सुरू असलेले दिसून आले. विशेष म्हणजे यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा गैरवापर होत आहे. दरमहा हजारो रुपयांचे वीज बिल प्रत्येक शासकीय कार्यालयाला भरावे लागत आहे. प्रशासकीय इमारतीतही विजेचा अपव्ययबुलडाणा बसस्थानकांसमोरील प्रशासकीय इमारतीत अनेक कार्यालये आहेत. या कार्यालयातही विजेचा अपव्यय होताना दिसून आला. या ठिकाणी रोजगार व स्वंयरोजगार, कामगार अधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत वितरण कार्यालय, वेतन पथक आदी कार्यालये आहेत. मात्र, सर्वच कार्यालयात दिवसा विजेचा अपव्यय होताना दिसून आला. विशेष म्हणजे काही कार्यालयात कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती. चार कर्मचाऱ्यांसाठी दहा ट्युबलाइटतहसील कार्यालयातील जवळपास सर्व विभागात चार ते पाच कर्मचारी काम करीत होते. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी विभागात दहा ट्युबलाइट सुरु होते. शिवाय कार्यालयात इतर अधिकारी उपस्थित नसतानाही त्यांच्या कॅबिनमध्ये पंखा व लाइट सुरु होते. शिवाय इतर विभागातील लाइट व पंखे अनावश्यकरीत्या सुरूच होते. अशीच परिस्थिती इतर कार्यालयात दिसून आली.व्हरांड्यातील ट्युबलाइट सुरूच!बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अद्यापही वीज बचतीचे महत्त्व समजले नाही. येथील मागील बाजूला असलेल्या नवीन इमारतीत आतील व्हरांड्यातील ४० वॅट ट्यूबलाइट भरदिवसा सुरूच होता. येथून ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मात्र लाइट बंद करण्याची तसदी घेतली नाही.रिकाम्या खुर्च्यांना हवा व प्रकाश!स्थानिक पंचायत समिती कार्यालय चकाचक करण्यात आले आहे. प्रत्येक विभागात नवीन पंखे व ट्युबलाइट लावण्यात आले. मात्र, बऱ्याच विभागात कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित नसतानाही पंखे व दिवे सुरू होते. त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.