शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मतदार जागृतीसाठी इलेक्ट्रोरल लीटरसी क्लबची स्थापना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:07 IST

बुलडाणा :  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणार्या विशेष  मोहिमेतंर्गत १२ हजार ५८0 नव मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविशेष मोहिमेत १२ हजार नव मतदारांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणार्या विशेष  मोहिमेतंर्गत १२ हजार ५८0 नव मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.  दरम्यान मतदानाविषयी मतदारांमध्ये जागृती व्हावी, यांसाठी इलेक्ट्रोरल लीटरसी  क्लबची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.  चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.शुक्रवारी जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उ पजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.      बीएलओ आपल्या दारी, इलेक्टोरल लीटरसी क्लब, चुनावी पाठशाळा,  व्होटर्स अवरनेस फोरम आदी उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. त्याच प्रमाणे १  जानेवारी २000 रोजी जन्म झालेल्या आणि १ जानेवारी २0१८ रोजी वयाची  १८ वर्षे पूर्ण करणार्या नव मतदारांचा सहस्त्रक मतदार म्हणून सन्मान  करण्यात येणार आहे. त्यामध्ये चार हजार मतदारांची ऑनलाईन तर ८,५८0  मतदारांची ऑफलाईन नोंदणी करण्यात आली. १0७0७ मतदारांनी नावे  वगळली तर १0८२ मतदारांनी नावात दुरुस्ती केली असल्याची माहिती  जिल्हाधिकारी यांनी दिली.  दरम्यान, बुथलेव्ह ऑफीस जुनी ओळखपत्रे  बदलून वीन ओळखपत्रे देणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडे नवीन छायाचित्र  देऊन स्मार्ट ओळखपत्र  देण्यात येणार आहे. शाळा महाविद्यालयामध्ये  मुलांसाठी चुनावी पाठशाळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामधून नवम तदारांची नाव नोंदणी करण्यात येणार ओह. सोबतच शाळा महाविद्यालयामध्ये  इलेक्टोरल लीटरसी क्लब स्थापन करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी यांनी  सांगितले.  शासकीय, निमशासकीय, अशासकीय कार्यालय व खाजगी संस्था  यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये कार्यालय प्रमुखाने वोटर अवरनेस फोरमची स्था पना करावयाची आहे.  नव मतदारांसाठी  नाव नोंदणी संक्षीप्त पुनर्निरिक्षण  कार्यक्रमातंर्गत ३0 नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.दरम्यान,   जे मतदार सहस्त्रक मतदार म्हणून नोंदणी करतील अशा मतदारांचा घरोघरी  जावून बीएलओ सत्कार करणार आहे.  २५ जानेवारी २0१८ ला तरूण म तदारांच्या समवेत त्यांना मी भारताचा सहस्त्रक मतदार आहे, असे लिहीलेले  खास बॅच व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी  सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूक