शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील १३११ सहकारी संस्थांच्या सहा टप्प्यांत हाेणार निवडणूका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 11:49 IST

Elections for co-operative societies in Buldana बुलडाणा जिल्ह्यात २०१९पासून सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या १३११ सहकारी संस्थांच्या निवडणुका सहा टप्प्यांत होऊ घातल्या आहेत. कोरोना संसर्गासह अन्य तत्सम कारणांनी या निवडणुका रखडलेल्या होत्या. त्या घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, त्या अनुषंगाने पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सविस्तर माहिती मागविली आहे. बुलडाणा जिल्ह्यात २०१९पासून सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्यानंतर २०२० मध्ये कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढल्यानंतर जिल्ह्यातील ११ बाजार समित्यांच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या गेल्या होत्या. दोन वेळा त्यास प्रत्येकी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने पुन्हा या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने त्यांच्याकडील सर्वंकष माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला पाठविली आहे. सहा टप्प्यांत या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. तीन-तीन महिन्यांच्या टप्प्यात कृषी, ग्रामीण सहकारी संस्था, दुग्धोत्पादन संस्था, सूतगिरणी, बाजार समित्यांसह अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.यात प्राधान्याने रखडलेल्या व २०१९-२० मध्ये व्हायच्या असलेल्या संस्थांची प्रथमत: निवडणूक होणार आहे. प्राथमिक स्तरावर ज्या संस्थांच्या मतदार याद्या तयार आहेत, त्यांना अंतिम स्वरूप देऊन निवडणुकांचा मार्ग मोकळा करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.

पहिल्या टप्प्यात ३३ संस्थांच्या निवडणुकापहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३३ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने पूर्वतयारी करण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. संस्थांच्या सदस्य-संख्येच्या आधारावर या संस्थांच्या निवडणुकांचा किमान दीड लाख रुपयांपासून खर्च सुरू होतो. संस्था मोठी असल्यास राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार या निवडणुका होतील, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाElectionनिवडणूक