शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीने ‘राजकारण’ तापले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 19:27 IST

जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त ३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीने प्रमुख पक्षांमधील ‘राजकारण’ तापविले असून, अंतिम मुदतीपर्यंत किती अर्ज दाखल होतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहिल असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समितीच्या रिक्त ३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक सोमवारी अर्ज दाखल केल्यानंतर होणार चित्र स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त ३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीने प्रमुख पक्षांमधील ‘राजकारण’ तापविले असून, अंतिम मुदतीपर्यंत किती अर्ज दाखल होतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहिल असे राजकीय जाणकारांचे मत आहे. लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या मतदार संघातून ही निवडणूक होणार आहे. लहान नागरी क्षेत्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्गातील स्त्री, सर्वसाधारण प्रवर्गातील स्त्री असे एकूण तीन सदस्य निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीत वाशिम, रिसोड, मंगरूळपीर व कारंजा नगर परिषदेतील निर्वाचित सदस्य मतदान करण्यास पात्र असणार आहेत. जवळपास १०० च्या आसपास मतदार आहेत. २२ आॅगस्टपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला. मात्र, अद्यापपर्यंत एकही अर्ज दाखल झाला असून, उद्या २८ आॅगस्ट ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. अंतिम मुदतीपर्यंत नेमके किती अर्ज दाखल होतात, यावर या निवडणुकीतील लढती अवलंबून राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  साधारणत: १० महिन्यांपूर्वी वाशिम, कारंजा, मंगरूळपीर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. कारंजाचा अपवाद वगळता वाशिम व मंगरूळपीर नगर परिषदेत शिवसेना-भाजपा या पक्षाने बºयापैकी जागा मिळविल्या तर कारंजा नगर परिषदेत भारिप-बमसंने सर्वाधिक जागा मिळवित निर्विवाद सत्ता हस्तगत केली. रिसोड नगर परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. निवडून येण्यासाठी सदस्य संख्या जूळविण्यात शिवसेना, भाजपा, भारिप-बमसंसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते फिल्डिंग लावण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते.  २९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर त्याचदिवशी वैध उमेदवारी अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाईल. फेटाळलेल्या उमेदवारी अर्जाविषयी ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत जिल्हाधिकाºयांकडे अपील करता येणार आहे. अपिलानंतर वैध उमेदवारी अर्जाची यादी ४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर असून १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. १५ सप्टेंबर २०१७ रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. या निवडणूकीत शिवसेना व भाजपाची युती होते की दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जातात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारंजा, वाशिम व मंगरूळपीर नगर परिषदेच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमध्ये पहिल्यांदाच भारीप-बमसंचा उमेदवार पाठविण्याच्या दृष्टिने भारीप-बमसंनेही व्यूहरचना आखल्याची चर्चा आहे. वाशिम, कारंजा व मंगरूळपीर या तिनही नगर परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरेशे संख्याबळ नसल्याने उमेदवार निवडून आणण्यासाठी दिग्गज नेत्यांचे कसब पणाला लागणार, असे बोलले जात आहे.