शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीस प्रारंभ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 11:48 IST

Gram Panchayat Election ४ हजार ७५१ जागांसाठी तब्बल १३ हजार २७७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले हाेेते.

ठळक मुद्देचिन्हवाटपानंतर ५ जानेवारीपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर लढती निश्चित झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  जिल्ह्यातील  ५२७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर लढती निश्चित झाल्या आहेत. चिन्हवाटपानंतर ५ जानेवारीपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असून राजकीय पक्षांनी माेठ्या ग्रामपंचायतींवर लक्ष केंद्रित केले आहे. ४ हजार ७५१ जागांसाठी तब्बल १३ हजार २७७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले हाेेते. त्यापैकी १७९ अर्ज छाननीत नामंजूर करण्यात आले. तसेच १३ हजार ९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले हाेते. पॅनलप्रमुखांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांना अपक्ष व बंडखाेरांना अर्ज मागे घेण्यासाठी विनवण्या कराव्या लागल्या. उमेदवारी अर्ज माेठ्या प्रमाणात दाखल झाल्याने ही निवडणूक चुरशीची हाेणार आहे. ४ जानेवारी राेजी चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर आता निवडणूक असलेल्या गावांमध्ये प्रचारास प्रारंभ हाेणार आहे. या वेळी माेठ्या ग्रामपंचायती असलेल्या गावांवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आपले लक्ष केंद्रित केल्याने रंगत वाढली आहे.

पाच तालुक्यात १०२९ अर्ज मागे जिल्ह्यातील पाच तालुक्यात १००३ उमेदवारांनी १०२९  अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये देउळगाव राजा, मेहकर, लाेणार, शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील उमेदवारांचा समावेश आहे. या पाचही तालुक्यात आता २७६९  उमेदवार रिंगणात आहेत.  ग्रामपंचायतींसाठी माेठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने प्रशासनाची दमछाक हाेत आहे. 

माेठ्या ग्रामपंचायतींकडे जिल्ह्याचे लागले लक्ष जिल्ह्यात १७ सदस्य असलेल्या १९ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींवर सत्ता कोणाची येणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांचे गाव असलेल्या हिवरा खुर्द येथेही निवडणूक हाेत आहे. या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच इतरही पदाधिकाऱ्यांचा कस निवडणुकीत लागणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक