शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर पांग्रा येथील आठ वर्षीय चिमुकलीने केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:35 IST

गावात आगमण होताच ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव व टाळ्या वाजवून मुलीचे स्वागत केले. 

बुलडाणा :  सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील आठ वर्षीय चिमुकली मुंबई येथे कोरोना बाधित झाली होती. तिच्यावर मुंबईत एका रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातून मलकापूर पांग्रा येथे दाखल होताच या चिमुकलीला बुलडाणा येथे कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले. या चिमुकलीने कोरोना विरोधातील लढाई जिंकत कोरोना आजारावर मात केली. तिची २३ मे रोजी कोवीड केअर सेंटर येथून सुट्टी करण्यात आली. या मुलीचे गावात आगमण होताच ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव व टाळ्या वाजवून मुलीचे स्वागत केले.  जिल्ह्यात एकूण ३६ कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी २२ मेपर्यंत २५ रुग्णांना बरे झाल्यामुळे  त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मलकापूर येथील चार, खामगाव तालुक्यातील दोन, शेगाव येथील तीन, सिंदखेड राजा तालुक्यातील दोन, देऊळगाव राजा येथील दोन, चिखली येथील तीन, बुलडाणा येथील ८ व जळगाव जामोद येथील एक अशो २५ रुग्णांचा समावेश आहे. तसेच तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात आठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील आठ वर्षीय मुलगी १३ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने परिसर सील होऊन तिच्या सह १९ जणांना  क्वारंटीन करण्यात आले होते. त्यातील दुसºया दिवशी संपर्कातील  १९ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना कोविड रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. मलकापूर पांग्रा येथील कोरोना बधीत मुलीवर बुलडाणा येथे कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर या चिमुकलीने कोरोना विरोधातील लढाई जिंकली. त्यामुळे  मलकापूर पांग्रा येथील चिमुकलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देऊन रुग्णालयातून सुटी  देण्यात आली.  यावेळी डॉक्टर्स, नर्सेस व ब्रदर्स यांनी चिमुकलीचे टाळ्या वाजवून स्वागत केले. चिमुकलीला मोठ्या आनंदाने निरोप देण्यात आला. शासनाच्या रुग्णवाहिकेतून मलकापूर पांग्रा येथे घरी सोडण्यात आले. यावेळी चिमुकलीच्या पालकांनी आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या काळजीबद्दल आभार व्यक्त केले.   

मलकापूर पांग्रा गावात मुलीचे अनोखे स्वागतमलकापूर पांग्रा गावातील वैद्यकीय अधिकारी, सरपंच, ग्राम विकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, गावातील खाजगी डॉक्टर ज्या ज्या लोकांनी परिश्रम घेतले त्या सर्वांनी आज बस स्थानकावर ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्या मुलीचे  फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.  यावेळी सरपंच पती साबीर खान पठाण, ग्रामविकास अधिकारी उद्धव गायकवाड, परमेश्वर दानवे, डॉ. सुरेश, डॉ. डोडिया, डॉ. आघाव, डॉक्टर आशिष दाभेरे, बीट जमदार नारायण गीते, विशाल बनकर अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या