शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आठ शिक्षकांना तीन वर्षापासून घरबसल्या पगार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:52 IST

खामगाव : शहरातील नगरपालिकेच्या स्व.इंदिरा गांधी हायस्कूल(म्युनिसीपल हायस्कूल)मध्ये तब्बल आठ शिक्षक अतिरिक्त झालेले असून त्यांना घरबसल्या तीन वर्षापासून पगार दिला जात आहे. या शिक्षकांवर वार्षिक ३६ लाख ९0 हजार रुपयांप्रमाणे आतापर्यंत एक कोटीहून अधिक खर्च झाल्याचे दिसून येते. सदर गंभीर बाब नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या पत्रातून उघड झाली.

ठळक मुद्देनगरपालिकेच्या स्व.इंदिरा गांधी हायस्कूल मध्ये आठ शिक्षक अतिरिक्त आतापर्यंत पालिकेचे एक कोटी रुपये खर्च नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या पत्रातून उघड

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील नगरपालिकेच्या स्व.इंदिरा गांधी हायस्कूल(म्युनिसीपल हायस्कूल)मध्ये तब्बल आठ शिक्षक अतिरिक्त झालेले असून त्यांना घरबसल्या तीन वर्षापासून पगार दिला जात आहे. या शिक्षकांवर वार्षिक ३६ लाख ९0 हजार रुपयांप्रमाणे आतापर्यंत एक कोटीहून अधिक खर्च झाल्याचे दिसून येते. सदर गंभीर बाब नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या पत्रातून उघड झाली.

प्रभाग क्रमांक ९ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी गुरुवार ३ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी यांना पत्र दिले. सदर पत्रात नमूद केले आहे की, म्युनिसीपल हायस्कूलमध्ये गत काही वर्षांपासून शैक्षणिक दर्जा घसरल्यामुळे पालकांनी या शाळेकडे पाठ फिरविली. सद्यस्थितीत वर्ग ५ ते ८ मध्ये१२१ तर वर्ग ९ ते १0 मध्ये २४१ विद्यार्थी आहेत. आश्‍चर्याची बाब म्हणजे एकूण ३६२ विद्यार्थ्यांच्या मागे २१ शिक्षकांचा भरणा आहे. यावरुन १७ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असून शासन निर्णयानुसार ८ शिक्षक अतिरिक्त ठरलेले  आहेत. या शिक्षकांना शाळेत एक तासही कार्य न करता मागिल ३ वर्षापासून वेतन देण्यात येत आहे. यापोटी शासनास ३६ लाख ९0 हजार रुपये वार्षिक वेतन घरी बसलेल्या शिक्षकांना द्यावे लागते. यानुसार आतापर्यंत एक कोटीहून अधिक शासनाची रक्कम व्यर्थ खर्च झाल्याचे दिसून येते. एकीकडे खासगी संस्था भरभराटीस येत आहेत. शासनाच्या शाळेवर अफाट खर्च होवूनही शाळेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. इतरही शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक नगरपालिकेच्या इतरही शाळांमध्ये पटसंख्या रोडावलेली असून या शाळेत काही शिक्षक अतिरिक्त ठरलेले असण्याची शक्यता आहे.