शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दिलीपकुमार सानंदांसह आठ जणांना अटकपूर्व जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:11 IST

खामगाव : येथील बहुचर्चित शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहार  प्रकरणातील आरोपी माजी आमदार दिलीपकुमार सानंदांसह  आठही जणांना ३ ऑगस्ट रोजी अटकपूर्व जामीन मंजूर  करण्यात आला आहे. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र  न्यायालयाने दिला आहे.

ठळक मुद्देबहुचर्चित शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहार प्रकरणअतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला निकाल 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील बहुचर्चित शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहार  प्रकरणातील आरोपी माजी आमदार दिलीपकुमार सानंदांसह  आठही जणांना ३ ऑगस्ट रोजी अटकपूर्व जामीन मंजूर  करण्यात आला आहे. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र  न्यायालयाने दिला आहे.स्थानिक शिवाजी वेस भागातील श्री शिवाजी व्यायाम मंदिर  इमारत बांधकामात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी २३ मे रोजी  रात्री न.प.च्यावतीने देण्यात आलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर  पोलिसांनी विविध कलमान्वये तब्बल २0 गुन्हे दाखल करण्यात  आले आहेत.या प्रकरणातील आरोपींपैकी गोकुलचंद सानंदा, माजी आमदार  दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा,  सरस्वती खासणे आदींनी प्रथम येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र  न्यायालयात धाव घेऊन गुन्हे दाखल होण्यापूर्वीच अंतरिम  अटकपूर्व जामीन मिळविला होता. २५ मे रोजी डिगांबर खासणे,  महावीर थानवी, कांतीलाल भट्टड यांनी न्यायालयात अंतरिम  अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी  होऊन त्यांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यात आला होता. त्यानंतर न.प.चे तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख  यांनीही न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविला हो ता. यासर्व अटकपूर्व जामीन अर्जावर एकत्रितरीत्या सुनावणी  ठेवली होती. जून, जुलै व ऑगस्टमध्ये विविध तारखांना  झालेल्या सुनावणीअंती ३ ऑगस्ट रोजी या अटकपूर्व जामीन  अर्जावर न्यायाधीश सूर्यवंशी यांनी निर्णय देऊन या आठही  आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.