चिखली (जि. बुलडाणा) : शेतात काम करत असताना तालुक्यातील करवंड येथे अस्वलाच्या हल्ल्यात ठार झालेल्या लालसिंग सेवा पवार व श्रीकृष्णनगर येथील श्याम उत्तम जाधव यांच्या कुटुंबांना आमदार राहुल बोंद्रे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून दोन महिन्यांच्या आत प्रत्येकी आठ लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे. या मदतीचे धनादेश मृतांच्या कुटुंबांना आ. बोंद्रे यांच्या हस्ते देण्यात आले. करवंड येथे शेतात काम करत असताना अस्वलाच्या दोन वेगवेगळय़ा हल्ल्यात करवंड येथील लालसिंग सेवा पवार व श्रीकृष्णनगर येथील श्याम उत्तम जाधव यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या दोघांच्या कुटुंबांना शासनाची मदत तत्काळ मिळावी, यासाठी व वाढत्या जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांबाबत वन विभागाने उपाययोजना कराव्यात, यासाठी ३0 मे रोजी वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन आ.बोंद्रे यांनी शेतकर्यांच्या व्यथा मांडल्या होत्या.. मृत्यू झालेल्यांना तत्काळ मदत व त्यांच्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. आ. बोंद्रे यांच्या मागणीची दखल घेत वन विभागाने तत्काळ या दोघांना मदत करण्याच्या हेतूने प्रत्येकी आठ लाखांची मदत मंजूर केली. या मदतीचा धनादेशाचे १७ जुलै रोजी आ.राहुल बोंद्रे यांच्या हस्ते स्थानिक माळीभवन मध्ये वाटप करण्यात आले.
कुटुंबांना प्रत्येकी आठ लाखांची मदत
By admin | Updated: July 20, 2016 00:25 IST