शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या प्रवेशाकरिता ‘शैक्षणिक रथ’

By admin | Updated: June 13, 2017 00:17 IST

लोकसहभाग : माजी विद्यार्थ्यांनी केली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : येथील जिल्हा परिषदमधील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेला भरघोस मदत दिली असून, शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, याकरिता ‘शैक्षणिक रथ’ तयार केला आहे. गावात तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये हा रथ फिरवून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना सामावून घेतले. समाजाचे आपणही काही देणं लागतो, या भावनेतून या ग्रुपच्या माध्यमातून शाळेच्या विकास कामाकरिता लोकवर्गणी जमा होत आहे. या ग्रुपवर जे विद्यार्थी आहेत, त्यामधूनच जिल्हा परिषद शाळेच्या प्रचारासाठी ‘शैक्षणिक रथ’ ही संकल्पना समोर आली. त्यानुसार अरुण जाधव, सतीश म्हस्के, शिक्षक अनंत शेळके, विलास ठाकरे, अशोक ठाकरे यांनी गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्याकडे ही कल्पना मांडली. पागोरे यांनी अनुमती दिल्यानंतर शैक्षणिक रथ तयार करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी हा रथ गावात फिरवून यात्रा काढण्यात आली. जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘शैक्षणिक रथ’ यात्रेचे उद्घाटक गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच मालता वडतकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अरुण जाधव, सतीश म्हस्के, विजय धोंडगे, मंगेश काकडे, संतोष काळे, नितीन इंगळे, गजानन कंकाळ, राज ठाकरे, विस्तार अधिकारी अनिल शेळके, केंद्रप्रमुख दादाराव जाधव, पेनटाकळीचे पैनगंगा फाउंडेशनचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते. गावांमध्ये फिरणार रथ शैक्षणिक रथ हा विवेकानंदनगर केंद्रातील विवेकानंदनगर, ब्रम्हपुरी, नांद्रा धांडे, बाऱ्हई, हिवरा बु., शिवाजीनगर, पोखरी, दुधा, रायपूर तर लव्हाळा केंद्रातील लव्हाळा, लोणी, पिंपळगाव उंडा, मोहखेड, गजरखेड, पेनटाकळी, माळखेड, वरदडा, वैशिष्ट्ये, गुणवत्ता याचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने हा शैक्षणिक रथ फिरविण्यात आला.विविध उपक्रमांची माहितीडिजिटल बॅनर त्यावर शाळेची वैशिष्ट्ये, उपक्रम आदींबद्दल सविस्तर माहिती, आॅडिओ, समोर बॅण्ड बाजा, लेजीम पथके, विद्यार्थी यासह सजलेल्या शैक्षणिक रथाचे सर्व गावात गावकऱ्यांनी स्वागत केले.