शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी आठ दिवसांपासून अन्नत्याग

By admin | Updated: June 25, 2017 13:39 IST

पाऊस यावा यासाठी अन्नत्याग करुन व मौनव्रत करुन देवाला साकडे घातले आहे.

राजस्थानच्या साधूची तपस्या: वाशिम तालुक्यातील सोयता शेतशिवारात मांडले ठाण कोंडाळा महाली : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत असताना आनंदराज उर्फ जयहरी महाराज यांनी सोयता येथील प्रवेश राऊत यांच्या शेतात १९ जुनपासून पाऊस यावा यासाठी अन्नत्याग करुन व मौनव्रत करुन देवाला साकडे घातले आहे.मूळचे पुणे येथील रहिवासी असलेले आनंदराज महाराज यांनी ३० वर्षापासून घराचा त्याग केला असून, त्यांची सतत  भ्रमंती सुरू आहे.  ते २००५ मध्ये विदर्भात आले. त्यानंतर ते काही वर्षे सोयता येथे रघुनाथ स्वामी संस्थानवर राहिले. त्यांनी सलग तीन वर्षे सोयता येथे अखंड हरिनाम व श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते.  त्यानंतर ते  राजस्थान मध्ये गेले. राजस्थान मध्ये त्यांनी पावसासाठी अनेक वेळा  पावसासाठी तपश्या केली. राजस्थानमध्ये त्यांना बारीशवाले बाबा म्हणून ओळखतात. ते राजस्थानमधून ३० मे विदर्भात आले. शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली असून, गेली आठ दिवसापासून परिसरामध्ये पाऊस न आल्यामुळे पिकासाठी पाऊस अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. त्याकरिता पाऊस यावा म्हणून गेली पाच दिवसापासून अन्नत्याग करुन मौन धरले आहे. तसेच पाऊस येत नाही तोपर्यंत स्रान न करण्याचाही त्यांनी संकल्प केला असून, भर उन्हामध्ये उभे राहून त्यांची तपस्या सुरु आहे.