शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीवर लागणार आता ई-टॅग प्रणाली!

By admin | Updated: February 22, 2017 02:29 IST

टोल नाक्याला बाय बाय; प्रवाशांचा वाचणार वेळ

सिध्दार्थ आराख खामगाव, दि. २१- महामार्गावर धावणार्‍या एसटीला जागोजागी असलेल्या टोल नाक्यावर ब्रेक लागत होते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जायचा. यावर उपाय म्हणून एसटीला पासेस देण्यात आल्या; मात्र तरीही पास दाखविण्यापुरती का होईना, वेळेचा अपव्यव होत होताच. आता यावर उपाय म्हणून एसटीला ई-टॅग प्रणाली लावण्यात येणार आहे. या सुविधेमुळे टोल नाक्यावर न थांबता एसटी भरधाव निघून जाणार; मात्र तरीही एसटीकडून टोल वसूल केल्या जाणार आहे. या नव्या प्रणालीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. महाराष्ट्रात सध्या प्रवासाचे प्रभावी माध्यम एसटी हेच आहे; पण जागोजागी निर्माण झालेल्या टोल नाक्यामुळे एसटीला ब्रेक लागतो. काही वेळेस १५ ते २0 मिनिटे सहज जातात. यावर प्रवाशी नेहमीच चिडचिड करतात. याला आता खो बसणार आहे. एसटीच्या नवीन ई-टॅग प्रणालीमुळे टोलनाक्यावर कोणत्याही अडथळ्याविना एसटी धावू शकणार आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो गाड्या दररोज रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे एसटीसाठी टोल फ्री करावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होती. यावर उपाय म्हणून एसटीला मासिक पास देण्यात आली होती. यामुळे दररोज पैसे द्यावे लागत नसले, तरी वेळ मात्र तेवढाच जात होता. हा वेळ वाचविण्यासाठी एसटीने ई-टॅग ही आधुनिक प्रणाली अतित्वात आणली आहे. ई-टॅग प्रणाली राष्ट्रीय महामार्गावर धावणार्‍या बससाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये एसटीच्या दर्शनी भागातील काचेवर विशिष्ट प्रकारचे स्टिकर चिकटवलेले असेल. एसटी राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर गेल्यास, आहे त्याच वेगात स्टिकर स्कॅन केले जाईल. त्यानंतर त्याची नोंद तेथील संगणकावर केली जाणार आहे. यासाठी बँकेमध्ये आगारनिहाय खाते उघडलेले असेल. या खात्यामध्ये दर महिन्याला ठरावीक रक्कम भरणा केली जाणार आहे. एसटीचे स्टिकर स्कॅन झाल्यावर गाडीच्या नंबरची नोंद होणार आहे. त्यामुळे त्याच क्षणी बँकेच्या खात्यातून ठरलेली रक्कम कापून घेतली जाणार आहे. याचा संदेश तत्काळ विभाग नियंत्रक, लेखाअधिकारी व आगार व्यवस्थापकांना जाणार आहे. ई-टॅगच्या वाहनासाठी स्वतंत्र लेनटोल नाका आला म्हणजे रांगेत वाहने उभी करणे, एखादे छोटे वाहन मध्येच शिरल्यास होणारी वादावादी त्यातून मार्ग काढून टोल नाक्याच्या वसुली केंद्रापर्यंत पोहोचल्यावर पैसे किंवा पास दाखविणे यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर ई-टॅग लावलेल्या स्टिकरच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन तयार करण्यात येणार आहे. याशिवाय ई-टॅग प्रणाली लागू झाल्यानंतर एसटीला टोलमध्ये १0 टक्के सूटसुद्धा मिळणार असल्याची माहीती एसटीच्या सूत्रांनी दिली. महामार्गावर धावणार्‍या बसची नोंदएसटी महामंडळाच्या कोणत्या मार्गावर कोणत्या बसगाड्या धावणार आहेत, याचे नियोजन राज्य परिवहन महामंडळ करून ते राष्ट्रीय महामार्ग त्या विभागाला देणार आहेत. त्यामुळे कोणतीही तांत्रिक अडण प्रवासात येणार नाही. याव्यतिरिक्त एखादेवेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पर्याय म्हणून अतिरिक्त वाहनांची यादी दिली जाणार आहे. त्यामुळे अडचणी येणार नाहीत.