धाड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर निघालेल्या मिरवणुकीत नाचत असताना पाय घसरून पडल्यानंतर एका इसमाचा मृत्यू झाला. ही घटना ६ आॅगस्ट रोजी धाड येथे सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. परिसरातील बोरखेड येथील गुलाबराव सपकाळ (४५) हे कुंबेफळ येथील उमेदवार जगन्नथ वाघ यांच्या धाड येथे निघालेल्या विजयी मिरवणुकीत सहभागी झाले. मिरवणुकीत नाचण्याच्या उत्साहात त्यांचा पाय घसरुन ते रस्त्यालगतच्या दगडावर पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर मिरवणुकीत गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ पोलिसांनी माहिती दिली. वृत्त लिहिपर्यत घटनेची नोंद झाली नव्हती. सपकाळ यांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी धाड पोलीस पुढील तपास करीत आहेत.