शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुतखड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान किडनीच केली गायब

By admin | Updated: August 23, 2016 23:57 IST

बदनापूर येथील डॉक्टराचा प्रताप; रुग्णाची पोलिसात धाव.

चिखली(जि. बुलडाणा), दि. २३: सततच्या पोटदुखीमुळे त्रस्त झालेल्या चिखली येथील रुग्णाची किडनी बदनापूर येथील डॉक्टराने शस्त्रक्रियेदरम्यान काढून घेतली असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. पोलिसात तक्रार देताच डॉक्टरने या प्रकारची कबुलीही दिली आहे. चिखली तालुक्यातील मेरा बु. येथील ५२ वर्षीय अशोक लिंबाजी डोंगरदिवे यांना नेहमी पोटदुखीचा त्रास होत होता. वैद्यकीय निदानात मुतखडा असल्याचे स्पष्ट झाले होते. मुतखड्याचा आकार मोठा असल्याने त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे जालना जिल्हय़ातील बदनापूर येथे मोफत उपचार केले जात असल्याची माहिती मिळाल्याने डोंगरदिवे यांनी २ जुलै रोजी बदनापूर येथील नूर हॉस्पीटलमध्ये गेले. तेथील डॉ.एम.डी.गायकवाड यांनी शस्त्रक्रिया केली. मात्र, मुतखड्याची शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरांनी त्यांची किडनीच काढून घेतली. ही बाब डोंगरदिवे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुअण्णा पडघान व अन्य ग्रामस्थांना सोबत घेऊन डॉक्टरांना जाब विचारला. मात्र, डॉक्टरांनी अरेरावीची भाषा वापरून उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अशोक डोंगरदिवे यांनी बदनापूर पोलीसांत धाव घेत संबंधीत डॉक्टराविरूध्द रितसर तक्रार दाखल केली आहे. डॉक्टरने दिली कबुली किडनी गायब असल्याची बाब समजल्यानंतर डॉक्टरांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या रूग्ण, ग्रामस्थ व नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यासह अरेरावी करणार्‍या डॉ.गायकवाड याने पोलिसांत तक्रार दाखल होताच चूक कबूल करून शस्त्रक्रियेदरम्यान दरम्यान किडनीला कात्री लागून रक्तस्त्राव झाला. त्यामुळे किडनी निकामी झाल्याने ती काढावी लागली, असे सांगून नुकसानभरपाई देण्याचे कबूल केले आहे, अशी माहिती पिडीत रूग्ण डोंगरदिवे यांनी दिली आहे.