बुलडाणा : तालुक्यातील कोलवड गावामध्ये शेतरस्ता मंजूर झाल्यामुळे मागिल तीन वर्षापासून काम सुरू होते. मात्र या कामाचे अद्यापही देयक न मिळाल्यामुळे काम करणारे व्यक्ती ग्रामपंचायतमध्ये येवून मानसिक त्रास देत आहेत. त्यामुळे सरपंचावर आत्मदहनाची वेळ आली असून, अनुदान न मिळाल्यास २४ जुलै रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.बुलडाणा तालुक्यातील कोलवड ग्रामपंचायतीने सन २०१५-१६, २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये गावाला जोडणारा शेत रस्ता क्रमांक १ व २ मंजूर करून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गंत काम सुरू करण्यात आले आहे. आपल्या गावाचे काम चांगले व्हावे, या दृष्टीकोनातून कामासाठी लागणारे मजूर, टॅक्टर तसेच वाहन चालकांची चांगल्या पध्दतीने काम केले. मात्र त्यांना अद्यापपर्यंत मजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तींच्या कुटुंबियांची होरपळ होत आहे. याबाबत झालेल्या कामाचे जवळपास ४ लाख २५ हजार रूपये पर्यंतची कुशल कमाची बिले पंचायत समिती बुलडाणा येथे सादर करण्यात आली आहेत. मात्र अद्यापही बिले काढण्यात न आल्यामुळे कामाची संबंधित मजुरांचे हाल होत आहेत. सदर काम ठेकेदारांमार्फत न करता ग्रामपंचायत करीत असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना चिरीमिरी मिळत नसल्यामुळे बिले काढण्यात येत नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत वरिष्ठांनी दखल घेवून त्वरित कामाचे देयक मंजूर करावे, अशी मागणी सरंपच पाटील व संबंधित मजुरांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.सदर कामाची बिले न मिळाल्यामुळे मजुरांची उपासमार होत आहे. याची वरिष्ठांनी दखल घेवून त्वरित बिले मंजूर करावी, अन्यथा आत्मदहन करण्यात येईल.-कौतीकराव पाटील, सरपंच, कोलवड ता. बुलडाणा.
रस्त्याचे देयक न मिळाल्याने सरंपचावर आत्मदहनाची वेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 17:59 IST
सरपंचावर आत्मदहनाची वेळ आली असून, अनुदान न मिळाल्यास २४ जुलै रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
रस्त्याचे देयक न मिळाल्याने सरंपचावर आत्मदहनाची वेळ!
ठळक मुद्देकामाचे जवळपास ४ लाख २५ हजार रूपये पर्यंतची कुशल कमाची बिले पंचायत समिती बुलडाणा येथे सादर करण्यात आली आहेत.