शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’मुळे पोळ्यावर महागाईचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:22 IST

खामगाव : शेतकर्‍यांचा जीवाभावाचा सोबती वृषभ राजाचा सण  पोळा तोंडावर आल्याने साजशंृगाराच्या साहित्याने बाजारपेठ  सजली आहे; परंतु यंदा जीएसटीमुळे पोळ्यावर महागाईचे सावट  असून, त्यात दुष्काळी परिस्थितीची भर पडली आहे. त्यामुळे शे तकर्‍यांमध्ये निराशेचे वातावरण दिसून येत आहे.

ठळक मुद्देसाजशृंगाराचे साहित्य महागल्याने शेतकर्‍यांमध्ये निराशा

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकर्‍यांचा जीवाभावाचा सोबती वृषभ राजाचा सण  पोळा तोंडावर आल्याने साजशंृगाराच्या साहित्याने बाजारपेठ  सजली आहे; परंतु यंदा जीएसटीमुळे पोळ्यावर महागाईचे सावट  असून, त्यात दुष्काळी परिस्थितीची भर पडली आहे. त्यामुळे शे तकर्‍यांमध्ये निराशेचे वातावरण दिसून येत आहे.शेतकर्‍यांच्या सोबत शेतामध्ये वर्षभर राबराब राबणार्‍या  बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी शेतकरी  बांधवांकडून पोळा हा सण साजरा केला जातो. यावेळी बैलांना  न्हावू घालून साजशंृगार केला जातो. याकरिता आवश्यक साहि त्याची रेलचेल दुकानांमध्ये दिसून येत आहे; परंतु यावर्षी बैलांचे हे  साजशृंगाराचे साहित्य जीएसटीमुळे महागले आहे. त्यातच पावसाने  दीर्घकाळापासून दडी मारलेली असून, पिके धोक्यात आलेली  आहेत. संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी  वर्ग आर्थिक अडचणीत आहे. अशावेळी बैलांच्या साजशृंगाराचे  साहित्यसुद्धा महागल्याने शेतकर्‍यांचा उत्साह मावळला असून,  त्यांच्यात निराशेचे वातावरण दिसून येते. परिणामी, यंदाच्या  पोळ्यावर महागाईचे सावट असल्याने वृषभ राजाचा हा सण जेम तेमच साजरा होणार असल्याचे दिसून येत आहे. 

साजशंृगारासाठी हे साहित्य लागते पोळ्याच्या दिवशी आपल्या लाडक्या सर्जा-राजाला  सजविण्यासाठी शेतकरी विविध साहित्याची खरेदी करतात.  यामध्ये कवड्या, घुंगरमाळा, नवी वेसन,  नवा कासरा, पायातील  चांदीचे करदोडे, घुंगरु, शिंगांना बेगड, बाशिंग, अंगावरील झुल  असे विविध साहित्य लागत असते; परंतु यंदा हे साहित्य काहिसे  महागले आहे.