शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवर्षणग्रस्त १४ जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:56 IST

बुलडाणा : राज्यातील १४ जिल्हे हे अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असून, सिंचनाच्या अपुर्‍या सुविधा असल्याने या भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, त्यानुषंगाने राबविण्यात येणार्‍या बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत चार लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने हालचाली वेगवान केल्या आहेत.

ठळक मुद्देदोन वर्षात प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्यातील १४ जिल्हे हे अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असून, सिंचनाच्या अपुर्‍या सुविधा असल्याने या भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, त्यानुषंगाने राबविण्यात येणार्‍या बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत चार लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने हालचाली वेगवान केल्या आहेत.पश्‍चिम महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण भाग, तापी खोर्‍यातील काही भाग तथा आत्महत्याग्रस्त विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने या योजनेला प्राधान्य देण्यात आले आहे. यांतर्गत १४ नोव्हेंबर २0१७ ला योजनेला मान्यता देण्यात आली असून, २0 हजार १0२ कोटी रुपये यावर खर्च अपेक्षित आहे. १७ फेब्रुवारी २0१७ रोजी त्यानुषंगानेच मुख्यमंत्र्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा आणि अकोला जिल्ह्याचा दौरा करून या योजनेच्या कामांची औपचारिक सुरुवात केली आहे. १४ जिल्ह्यातील ११४ प्रकल्पांचा या योजनेंतर्गत समावेश आहे. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत ही कामे करण्यात येत आहेत.यात प्रामुख्याने रखडलेले काही मोठे प्रकल्प तथा लघू प्रकल्प प्राधान्याने आणि वेगाने पूर्णत्वास नेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव चहल यांनी दिली. दोन लाख ४४ हजार ७00 शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ होणार आहे.राज्यात सिंचनाचा प्रादेशिक स्तरावर अनुशेष निर्माण झाला आहे. तो दूर करण्याच्या दृष्टीने ही पावले उचलण्यात आली आहेत.सिंचन सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकर्‍याच्या आर्थिक संपन्नतेचा मार्ग मोकळा होतो. त्या दृष्टिकोणातूनच या प्रकल्पांना गती देण्याचे ठरविण्यात आले होते. पाणी आणि वीज या दोन गोष्टी शेतकर्‍यांना मिळाल्यास शेतकरी आत्महत्या रोखण्यास अधिक यश मिळाले, ही भूमिका डोळ्य़ासमोर ठेवून जलसंपदा विभागाने ही पावले उचलली असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या दोन वर्षात या योजनेंतर्गतचे प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रशासकीय पातळीवर प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा