शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीमुळे गणेश उत्सवावर विरजण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 23:21 IST

सिंदखेडराजा: ‘आला पोळा सण झाले गोळा’ ही म्हण जुनीच. पोळा होताच घरमालकीण घर सारवून, पुसून स्वच्छ करते. कारण त्यांना ओढ लागली असते ती श्री गणेशाची! गणेश उत्सव काळातच गौरीचे आगमन होत असते. त्यामुळे बाजारपेठा सजलेल्या असतात; परंतु यावर्षी दुष्काळाचे सावट पसरल्याने बाजारपेठेत पाहिजे तशी गर्दी दिसून येत नाही. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो.

ठळक मुद्देबाजारपेठेत शुकशुकाट अल्प पावसाचा परिणाम

अशोक इंगळे। लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: ‘आला पोळा सण झाले गोळा’ ही म्हण जुनीच. पोळा होताच घरमालकीण घर सारवून, पुसून स्वच्छ करते. कारण त्यांना ओढ लागली असते ती श्री गणेशाची! गणेश उत्सव काळातच गौरीचे आगमन होत असते. त्यामुळे बाजारपेठा सजलेल्या असतात; परंतु यावर्षी दुष्काळाचे सावट पसरल्याने बाजारपेठेत पाहिजे तशी गर्दी दिसून येत नाही. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो.प्रत्येक कामाची सुरुवात आपण श्री गणेशाच्या पूजनाने करतो. त्यामुळे यशाचे, प्रगतीचे, बुद्धीचे गमक म्हणून त्याला पूजतो. श्री गणेशाचे आगमन गणेश चतुर्थीला होत असून, बाजारपेठेत तीन दिवसांपूर्वीच गणेश मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत; परंतु तीन दिवसात गणेश मूर्तीची पाहिजे तशी विक्री झाली नाही. शुक्रवारला साखरखेडर्य़ात आठवडी बाजार भरतो. बाजाराच्या दिवशी विक्री होण्याची अपेक्षा विक्रेत्यांना आहे. साखरखेडर्य़ात आठवडी बाजार ते बसस्थानक परिसरात २0 ते २५ दुकाने सजली आहेत. ५0 रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत मूर्ती विक्रीसाठी आलेली आहे. किराणा बाजारातही पाहिजे तशी गर्दी दिसत नाही. तरीही श्री गणेशाच्या आगमनाची प्रतीक्षा प्रत्येकालाच असते. दुष्काळाची कितीही मोठी झळ असली तरी पोटाला चिमटा बसला तरी चालेल; पण श्री गणेशाचे उत्सवात स्वागत करायचेच ही खुणगाठ बांधून प्रत्येक व्यक्ती तयारीला लागला आहे. सगळ्या संकटांचे विमोचन करणारा हाच विघ्नहर्ता असल्याने तो आलेल्या संकटाचे निश्‍चितच निवारण करेल, अशी भावना प्रत्येकाची असते. यावर्षी आगमन होताच प्रत्येक शेतकरी, मजूर, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक एकच प्रार्थना करणार आहे. ‘श्री गणेशा आमच्यावर वरुणराजाची कृपादृष्टी होऊ दे आणि येणारे संकट दूर होऊ दे.