शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरातील दरड कोसळल्यामुळे धोका!

By admin | Updated: August 2, 2016 01:36 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष; बुलडाणा- मलकापूर मार्गावरून धावतात शेकडो वाहने.

नीलेश शहाकार / बुलडाणा बुलडाणा शहराला मलकापूर मार्गावर जवळपास ४ कि.मी.चा वळणदार घाट लाभला आहे. मात्र या घटातून जाणार्‍या वळणदार रस्त्यावर पावसाळ्यात वारंवार भूस्खलन होत असल्यामुळे घाटातून प्रवास करणार्‍या नागरिकांना धोका निर्माण होत आहे.शहराच्या चारही बाजूंनी अजिंठय़ाच्या डोंगररांगा आहेत. त्यामुळे शहराचा विस्तार थेट डोंगररांगांपर्यंत झाला आहे. शहरातून बाहेर निघाणार्‍या मुख्य मार्गापैकी बोथा घाट मार्गे खामगाव, अकोला शहराला जाता येते. तर राजूर घाटातून मोताळा, मलकापूर व पुढे मध्य प्रदेशात जाण्याचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग शहरासाठी महत्त्वाचे आहेत. यापैकी राजूर घाटातील मार्ग वळणार व जास्त जोखमीचा असून, येथून होणारी वाहतूक जास्त व्यस्त आहे. मात्र या घाटात असणारा डोंगर मुरमाड खडकाचा बनला असून, अतिपाऊस पडला, की माती भुसभुशीत होऊन डोंगरातील दगड रस्त्यावर येऊन पडतात. त्यामुळे घाटातील वळण रस्त्यांवर दगडांचा मोठा ढीग साचलेला दिसतो. घाटात बर्‍याच ठिकाणी धोकादायक वळण असून, नेमके त्याच ठिकाणी भूस्खलन होऊन रस्त्यावर व रस्त्यालगत मोठमोठे दगड पडलेले असतात. त्यामुळे बर्‍याचवेळा रात्रीच्यावेळी भरधाव वाहनांच्या चाकाखाली हे दगड आल्यामुळे वाहनाला अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बर्‍याच अपघातात नागरिक जखमी झाले, तर काहींचे जीवही गेले आहेत.वर्षभरात अपघाताची मालिकावर्षभरात तब्बल पंधरा अपघाताची नोंद आहे. यात श्री हनूमान मंदिरानजिक वळमार्गावर तेलाचे टँकर पडल्याची घटना ताजी आहे. तर काही महिन्यांपूर्वी मलकापूरला जाणार्‍या बसच्या चाकाखाली दगड येऊन ती उलटली होती. सुदैवाने यात हानी झाली. शिवाय डोंगरातील दगड पडून गाडीच्या काचा, नागरिकांची डोके फुटण्याच्या घटनाही नेहमीच्या आहेत.रात्री मोठय़ा वाहनांचा धोकारात्रीच्या वेळी बोधा घाटातील मार्ग बंद राहत असल्यामुळे मध्यप्रदेशकडे जाणार्‍या मोठय़ा वाहनाची राजूर घाटातून वर्दळ असते. शिवाय मलकापूर व मोताळाकडे जाणार्‍या नागरिकही याचा मार्गाने प्रवास करतात. बर्‍याचवेळा राजूर घाटात घडलेली लहानमोठय़ा अपघाताची मालिका मोठी आहे.