नांदुरा (जि. बुलडाणा) : महावितरण कंपनीच्या शेंबा येथील कार्यालय अंतर्गत येणार्या कंडारी येथील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने परिसरातील सात गावांचा पाणीपुरवठा १५ दिवसापासून बंद आहे. परिणामी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कंडारी प्रकल्पातील विहिरीवरून १४ हजार लोकसंख्येच्या सात गावांना पाणीपुरवठा होतो. तथापि, रोहित्र जळाल्याने तरवाडी, पोटा, खैरा, जवळा बाजार, बेलुरा, फुली, पिंप्री आढाव या गावांचा पाणीपुरवठा बंद आहे. पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिक शिवारातील विहिरींवरून पाणी आणत आहेत. महावितरणकडे तोंडी तक्रारी झाल्या असून, तरवाडी ग्रामपंचायतीने याबाबत लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे. दरम्यान, नवीन रोहित्र मलकापूर कार्यालयातून दोन दिवसांत येत आहे; ते त्वरेने बसविण्यात येईल, असे कनिष्ठ अभियंता आर. टी. वानखडेंनी सांगितले.
रोहित्र जळाल्याने सात गावांत पाणीटंचाई
By admin | Updated: October 12, 2015 01:21 IST