शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन तालुक्यात ड्राय स्पेल, ऑगस्ट महिन्यात ६० टक्के पावसाची तूट

By विवेक चांदुरकर | Updated: August 28, 2023 17:44 IST

पावसाअभावी पिके सुकत असून जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. 

खामगाव : जिल्ह्यात तीन तालुक्यात २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला असून, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ ४० टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी १८७.३ मिमी असून, केवळ ७६.२ मिमी पाऊस झाला. तसेच पावसाचा खंडही पडला आहे. पावसाअभावी पिके सुकत असून जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. 

जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यामध्ये अल्प पाऊस झाला. सरासरीच्या केवळ २५ टक्केच पाऊस झाल्याने पेरण्या लांबल्या. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. २२ जुलैच्या दरम्यान जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. मलकापूर, जळगाव जामोद, नांदुरा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. जुलै महिन्यामध्ये जिल्ह्यात सरासरीच्या १४२ टक्के पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा पावसाचा खंड पडला. २७ ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस झाला नाही. सोयाबीन फुलोऱ्यावर असून पावसाची नितांत गरज आहे. मात्र, पावसाअभावी सोयाबीनसह सर्वच पिके संकटात सापडली आहेत. पिके सुकत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पिकांना जोरदार पावसाची गरज आहे.महिना सरासरी पाऊस (मिमी) झालेला पाऊस (मिमी) टक्केजून १३९.३ ३५.१ २५.२जुलै १९२.२ २७३.४ १४२.२ऑगस्ट १८७.३ ७६.२ ४०.७वर्हाडातही पावसाची तूटबुलढाणा जिल्ह्यासोबतच वर्हाडातही पावसाची तूट आहे. अकोला जिल्ह्यात आॅगस्टपर्यंत ६४.८ टक्के पाऊस झाला आहे. तसेच वाशिम जिल्ह्यात ८१.५ टक्के तर अमरावती जिल्ह्यात ६३.१ टक्के पाऊस झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या जिल्ह्यात १०७.२ टक्के पाऊस झाला आहे.जिल्हा सरासरी पाऊस ऑगस्टपर्यंतचा पाऊसबुलढाणा ५१८.८ मिमी ७४.२ टक्केअकोला ५५४.७ मिमी ६४.८ टक्केवाशिम ६२३.३ मिमी ८१.५ टक्केअमरावती ६८०.९ मिमी ६३.१ टक्केयवतमाळ ६४९.७ मिमी १०७.२ टक्केएक जूनपासून ते २८ ऑगस्टपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात २६ टक्के पाऊस कमी पडला आहे. ५१८.८ मिमी पाऊस व्हायला हवा होता. ३८४.७ मिमी झालाआहे. ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी १८७.३ लिमीटर पाऊस होत असतो पण ७६.२ मिमी झाला आहे. तसेच पावसाचा खंडही पडला आहे.- डाॅ. विकास जाधवशास्त्रज्ञ, कृषिविज्ञान केंद्र, जळगाव जामोद

टॅग्स :khamgaonखामगाव