शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन विक्री विरोधात औषध विक्रेत्याचा एल्गार

By admin | Updated: May 27, 2017 19:40 IST

राज्यातील ५० हजार औषध विक्रेते ३० मे रोजी एक दिवसीय बंद पाळून निषेध नोंदविणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : केंद्र सरकार आॅनलाईन औषध विक्रीस कायदेशीर मान्यता देण्याच्या दृष्टीने तयारी करीत असून शासनाने पब्लीक नोटीस जाहीर करून सूचना व मार्गदर्शन मागविले आहे. ई - पोर्टलद्वारे औषधे खरेदी विक्रीच्या धोरणाविरोधात देशभरातील ८.५० लक्ष तर राज्यातील ५० हजार औषध विक्रेते ३० मे रोजी एक दिवसीय बंद पाळून निषेध नोंदविणार आहेत.अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना व सर्व राज्याच्या संघटना तसेच जिल्हा संघटना व वैयक्तिक औषधी विक्रेता यांच्या माध्यमातून जवळपास ५० हजारापेक्षा जास्त हरकती व सुचना सरकारकडे दाखल करण्यात आल्या आहेत. औषध विक्रेता व व्यावसायिक फायदा तोटा फक्त याच भूमिकेतून या निवेदनाकडे सरकारने पाहु नये तर त्यावरील मुद्यावर गांभीर्याने विचार करण्यात यावा अशी रास्त अपेक्षा संघटनेकडून व्यक्त केली जात आहे. जगातील अनेक प्रगत देशांनी आॅनलाईन फार्मसीचा विचार स्वीकारला नसून त्यामध्ये रशिया, जपान, इटली, चीन यासारख्या देशाचा समावेश आहे. ज्या देशांनी आॅनलाईन फार्मसीचा व्यवसायाला मान्यता दिली आहे अशा अनेक देशात सायबर क्राईममुळे त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहे. आपल्या देशात पायाभूत सुविधा अखंड विद्युत पुरवठा, इंटरनेट कनेक्टीव्हीटी प्रशिक्षीत मनुष्यबळाचा अभाव, प्रशासकीय अधिकाऱ्याची उणीव, नागरिकांमध्ये व रुग्णामध्ये नवीन तंत्रज्ञान हाताळण्याची क्षमता यासारख्या उणीवामुळे रुग्णांना सेवा परिपूर्ण मिळणार नाही. त्याचप्रमाणे आज भारतात ८.५ लक्ष व महाराष्ट्रात असलेले ५० हजार केमीस्टचे भवितव्य अंधकारमय होईल. या सर्व बाबीचा विचार करता संघटनेने आॅनलाईन फार्मसीला विरोध म्हणून अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना व महाराष्ट्र राज्य केमीस्ट अ‍ॅन्ड ड्रगीस्ट असो.ने विरोध म्हणून ३० मे रोज मंगळवारला एक दिवसाचा बंद पाळण्याचे संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सचिव अनिल नावंदर यांनी जाहीर केले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील औषध दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.