शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांचे उत्पन घटले, खर्च वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:33 IST

बुलडाणा : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत़ त्याचा फटका प्रवासी वाहतूक करण्यासाठी वाहने खरेदी ...

बुलडाणा : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत़ त्याचा फटका प्रवासी वाहतूक करण्यासाठी वाहने खरेदी करणाऱ्यांनाही बसला आहे़ व्यवसायासाठी खरेदी केलेली मोठ-मोठी चारचाकी वाहने घरीच पडून आहेत. परिणामी वाहनचालकांचे उत्पन्न घटले आहे. याउलट खर्च वाढला आहे. त्यामुळे तो खर्च भागवायचा कसा असा प्रश्न भेडसावत आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे १३ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लावण्यात आले. त्यासोबतच आंतरजिल्हा व आंतरबाह्य प्रवासाला निबंध घालण्यात आले आहे. त्यामुळे टूर अँड ट्रॅ्व्हलचा व्यवसाय ठप्प पडला आहे. या व्यवसायासाठी अनेकांनी मोठ-मोठ्या गाड्यांची खरेदी केली. परंतु, आता प्रवास बंद असल्याने गाड्या घरच्या पार्किगस्थळीच पळून आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पन्न बंद आहे; परंतु, गाडीचे मेंटन्सस, कर्जाची हप्ते आदी भरावे लागत आहे. बुलडाणा शहरात महागड्या चारचाकी व दुचाकी वाहनाचा वापर करणारे मोठ्या प्रमाणात शाैकीन आहे. मात्र, आता त्यांनाही बाहेर पडण्यास अडचण जात आहे. त्यामुळे वाहने घरच्या पार्किंगमध्ये आहेत. काहींनी तर दोन महिन्यांपासून वाहन पार्किंगमधून काढलेच नसल्याचे स्थिती आहे.

वाहने सुरू पण गॅरेज बंद

अत्यावश्यक सेवेतील वाहने धावत आहेत. त्यासोबतच दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर अनेकजण करत आहेत. परंतु, एखाद्या वेळेस गाडीत बिघाड आल्यास गॅरेज बंद असल्याने मोठी पंचायत होत आहे. सध्या गाडीत हवा भरण्यासाठी अडचण जात आहे. अनेकांना आपल्या गाडीच्या सर्व्हिसिंग करायच्या आहेत. मात्र, शोरूम बंद असल्याने त्यांच्या गाडीची सर्व्हिसिंग करता येत नसल्याचे चित्र आहे़

वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

गॅरेज व शोरूम बंद असल्याने वाहनात काही तांत्रिक बिघाड झाल्यास माेठी अडचण निर्माण होत आहे. काहींच्या गाड्या पंक्चर झाल्या असून गॅरेज बंद असल्याने घरीच पडून आहेत तर काहींना गाडीची वॉशिंग व सर्व्हिसिंग करायची आहे. मात्र तेसुद्धा करताना अडचण जात आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांना बँकांचे हप्तेही भरता येत नसल्याचे चित्र आहे़

वाहने पार्किंगगमध्येच

टूर ॲण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करण्याच्या उद्देशाने वर्षापूर्वी कर्जावर गाडी घेतली. मात्र, लगेच लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे प्रवासाला बंदी असल्याने गाडी घरीच पार्किंगमध्ये पडून आहे. कर्जाचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न आहे.

धीरज साेनुने, बुलडाणा

चारचाकीची आवड असल्याने मोठ्या आवडीने कार घेतली. परंतु, मागील वर्षीपासून लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे व्यवसाय ठप्प पडल्याने घरी आहे. त्यामुळे गाडीसुद्धा पार्किंगलाच आहे. वापरच होत नसल्याने फालतूच घेतल्याचे वाटत आहे.

विनाेद बाेंबटकार, बुलडाणा

गॅरजेवाल्यांची राेजीराेटी बंद

प्रयत्न करूनही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे गॅरेज टाकले. व्यवसायात जम बसत असतानाच लॉकडाऊन लागले. आता गॅरज बंद आहे. भाडे कसे द्यायचे, कर्ज कसे फेडायचे, उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न पडला आहे.

अमाेल शेळके, गॅरेज मालक, बुलडाणा

गॅरेजमधून दोघांना रोजगार दिला होता. परंतु कडक निर्बंधामुळे गॅरेज बंद असल्याने राेजगार गेला आहे़ व्यवसायच बंद असल्याने घरखर्च कसा भागवायचा, अशी मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे, कर्ज वाढत आहे़ शासनाने गॅरेजमालकांना मदत देण्याची मागणी हाेत आहे़

अजय गाेरे, गॅरेज मालक, बुलडाणा