शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:34 IST

जालना येथून आग्रा येथे बाजरीचे बियाणे घेऊन महेंद्रसिंग नामक ट्रकचालक जात होता. समुद्र सपाटीपासून २१९० फूट उंचीवर असलेल्या बुलडाणा ...

जालना येथून आग्रा येथे बाजरीचे बियाणे घेऊन महेंद्रसिंग नामक ट्रकचालक जात होता. समुद्र सपाटीपासून २१९० फूट उंचीवर असलेल्या बुलडाणा शहरालगत असलेल्या राजूर घाटात सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ट्रकच्या ब्रेकमधील वायसर खराब झाल्याने ट्रकचे ब्रेक लागत नव्हते. त्यामुळे उतारावर हा ट्रक अनियंत्रित झाला. त्यातच राजूर घाटातील हनुमान मंदिरानजीक जवळपास ८० अंशामध्ये असलेले वळण समोरच असल्याने हा ट्रक सुमारे ४०० फूट दरीत कोसळतो की काय? अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, ट्रकचालक महेंद्रसिंग याने कल्पकता लढवीत मंदिरानजीकच्या संरक्षक कठड्यावर ट्रक धडकवला. त्यामुळे संरक्षक कठड्याचे मोठे नुकसान झाले असले तरी चालकाचे प्राण वाचण्यासोबतच ट्रकही दरीत कोसळता कोसळता वाचला. काही स्थानिकांनी हा थरारक प्रसंग स्वत: बघितला. सुदैवाने या घटनेच कुठलीही प्राणहानी झाली नाही. ट्रकची काही चाके ही संरक्षक कठड्यात अडकल्याने मोठा अपघात टळला.

या अपघाताचे वृत्त कळताच बुलडाणा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विनायक रामोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले व घाटातील वाहतूक सुरळीत केली.

--गेल्या आठवड्यातही अपघात--

गेल्या आठवड्यातही राजूर घाटात याच घटनास्थळाजवळ नारळ घेऊन जाणारा ट्रक पहाटे सहाच्या सुमारास थेट दरीत कोसळला होता. त्यात चालकाचा मृत्यू झाला होता, तर त्याचा सहायक गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतरची ही दुसरी घटना आहे.

--ट्रकचालकाकडून नुकसान भरपाई--

या अपघातातील ट्रक चालकाचे नशीब चांगले म्हणून हनुमान मंदीरानजीकच्या संरक्षक कठड्यावर हा ट्रक धडकला व त्याचे प्राण वाचले. या घटनेमुळे मंदिरालगतच्या संरक्षक कठड्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ट्रकचालकाने मदत केली असल्याची माहितीही पोलीस उपनिरीक्षक विनायक रामोड यांनी दिली.