लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र, कोरोना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची ठिकठिकाणी पायमल्ली केली जात असतानाच, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील चालक आणि वाहकांनाही ‘मास्क’चे वावडे असल्याचे दिसून येते.
कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालण्यासाठी ‘मास्क’ अनिवार्य करण्यात आले. एसटीत प्रवासी तसेच चालक आणि वाहकांनाही मास्क अनिवार्य आहे. मात्र, गत काही दिवसापासून एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहकांना ‘मास्क’चे वावडे असल्याचे दिसून येतेे. ‘मास्क’ न वापरणाऱ्यांवर महामंडळाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.
000
लॉकडाऊननंतर काही नियमाच्या अधीन राहून महामंडळाला प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली. मास्क वापरणेही बंधनकारक आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार गत कित्येक दिवसापासून मास्क वापरत आहे. मंगळवारीही मास्क सोबत आहे. थुंकण्यासाठी मास्क बाजूला केला. इतक्यात आपला फाेटाे घेण्यात आला.
- वाहक
000
‘मास्क’ वापरणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले आहे. आपणही नियमित मास्क वापरतो. परंतु मास्कच्या नियमित वापरामुळे गत काही दिवसापासून दमकोडींचा त्रास वाढीस लागला आहे. त्यामुळे काही काळापुरता मास्क काढण्यात आला. बसमध्ये प्रवाशांची तिकिटे काढताना आपण गत अनेक दिवसापासून नियमित मास्कचा वापर करीत आहे.
- वाहक
०००
कोरोना विषाणू कालावधीचे चटके आपण भोगले आहे. त्यामुळे स्वत:सह इतरांनाही मास्क वापरण्यासाठी आपण प्रेरित करतो. मंगळवारी ड्युटीवर येण्याच्या गडबडीत मास्क घरी विसरलो. मात्र, रुमालाचा मास्क म्हणून वापर करीत आहे. एसटीतून बाहेर पडल्यानंतर काही काळासाठी रुमाल चेहऱ्याच्या बाजूला केला. मास्क लावलेला नाही, असे अजिबात म्हणता येणार नाही.
- चालक