शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठिबक सिंचन घोटाळा: विक्रेत्यांनी लाटले २४ शेतकऱ्यांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:38 IST

चार ठिबक विक्रेत्यांनी जवळपास २४ शेतकºयांच्या नावावर सुमारे १४ लाख ५१ हजार रुपयाचा अपहार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना सन २०१८-१९ अंतर्गत अनुदान लाटण्यासाठी ठिबक विक्रेत्यांनी शेतकऱ्यांच्या खात्याऐवजी आपल्या नातेवाईकांचे बँक खाते देवून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. चार ठिबक विक्रेत्यांनी जवळपास २४ शेतकºयांच्या नावावर सुमारे १४ लाख ५१ हजार रुपयाचा अपहार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाºयांनी जिल्हयातील मलकापूर व मोताळा तालुक्यातील चार ठिबक विक्र्ेत्यांना नोटीसेस बजावल्याने खळबळ निर्माण झाली आहे.बुलडाणा जिल्हयातील तेराही तालुक्यात कृषी विभागाचे अधिकारी, ठिबक विक्रेते व शेतकºयांच्या संगनमताने ठिबक सिंचन घोटाळा करण्यात आला आहे. ‘लोकमत’ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून ठिबक सिंचन घोटाळा उघड केल्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी बुलडाणा, मेहकर व खामगाव विभागाचे कृषी उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वात चौकशी सुरु केली आहे. यामध्ये अनेक गुपीते उघड होत आहेत. टेक्समो पाईप आॅन्ड प्रोडक्ट ली बहानपर या कंपनीचे अधिकृत वितरक म्हणून सोपान रमेश जुनारे (जय इरिगेशन मोताळा), विलास गणेश कुयटे (जय गजानन अ‍ॅग्रो सर्व्हिसेस खामखेड), मनिष चिंतामन जुनारे (साई अ‍ॅग्रो एजन्सी वरुड ता. मोताळा) व प्रशांत धनलाल संत (स्वरा इरिगेशन अ‍ॅण्ड पाईप) या चौघांना नेमले आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात २४ लाभार्थ्यांना ठिबक व तुषार संचाच्या अनुदानाचे प्रस्ताव तालुका स्तरावर प्राप्त झाले होते. त्यांच्याकडून ठिबकसाठीचे प्रस्ताव या कार्यालयास तालुका स्तरावरुन अनुदान अदा करण्याकरीता प्राप्त झाले होते. पी.एफ.एम.एस आॅनलाईन प्रणालीने अनुदान अदा करतांना त्यांच्या बँकेची माहिती चुकीची भरल्याचे दिसून आले. शेतकºयांचे बँकेचे खाते क्रमांक न भरता स्वत:च्या नातवाईकाचे ज्ञानेश्वर जुनारे व जयश्री जुनारे यांच्या बँक खात्याची माहिती आॅनलाईन ई-ठिंबक प्रणालीवर भरलेली असल्याची गंभीर स्वरुपाची बाब निदर्शनास आली.१४ लाख ५१ हजाराचा अपहारठिबक विक्रेत्यांनी स्वत:च्या नावावर १४ लाख ५१ हजार ४९९ रुपये एवढी रक्कम काढली आहे. केंद्र शासनाच्या ऐवढया मोठया महत्वाकांशी योजनेमध्ये एक जबाबदार व्यक्ती म्हणुन काम करत असताना अशाप्रकारची शासनाला खोटी माहिती देवुन शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी म्हटले आहे.

काळ््या यादीत टाकण्याची शिफारसशेतकºयांच्या नावावर अनुदान लाटून शासनाची दिशाभूल करणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. त्यामुळे याप्रकरणी संबधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करून त्यांचे नाव काळया यादीत टाकण्याबाबतचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडे पाठवण्यात आला आहे.

टॅग्स :khamgaonखामगाव