शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवाराची कामे होवूनही दरेगावात टंचाई

By admin | Updated: May 25, 2017 19:51 IST

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथे मागील वर्षी जलयुक्त शिवाराची कामे होवूनही पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून १ मे पासून या गावात टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे.

अशोक इंगळे।लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथे मागील वर्षी जलयुक्त शिवाराची कामे होवूनही पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून १ मे पासून या गावात टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे. सतत दुसऱ्या वर्षी टँकरने पाणीपुरवठा करणारे हे एकमेव गाव आहे. मागीलवर्षी अतिअल्प पाऊस झाल्याने नदी, नाले, विहिरी कोरड्या पडल्या होत्या. अनेक गावात विहिरी अधिग्रहण केल्यानंतर काही गावात टँकर सुरु करण्यात आले. त्यात दरेगाव या गावाचा समावेश होता. या गावाची लोकसंख्या ३ हजार असून, पाणी पुरवठ्यासाठी दोनवेळा खर्च करुनही पाणीटंचाई कायम आहे. नदीचे खोलीकरण, नाला खोलीकरण, जलयुक्त शिवार अंतर्गत बंधाऱ्याची कामे सुद्धा झाली. परंतु बंधाऱ्यात पाणी थांबले नाही. विहिरीतही पाणीसाठा नाही. एप्रिल महिन्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने ग्रामपंचायतने ठराव घेवून टँकरची मागणी केली. पंचायत समितीने टँकरची मागणी मान्य करुन टँकर मंजूर केले. मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही दरेगावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने पुढील वर्षी सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली तर पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागणार यात शंका नाही. त्यासाठी या गावात कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

५ गावात टँकर; २० गावात विहिर४सिंदखेडराजा तालुक्यात गोरेगाव, दरेगाव, सोनोशी, सावरगाव माळ, सुलजगाव या पाच गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून, दिवसाकाठी दोन ते तिन फेऱ्या टँकर पूर्ण करतात. दरेगाव येथील तीन हजार लोकवस्तीसाठी ४० हजार लिटर पाणी पुरविल्या जाते. गोरेगावातही तीन विहिरीत, सोनोशीत तिन विहिरीत, सावरगाव माळ, सुलजगाव, दरेगावात दोन विहिरीत पाणी टाकल्या जाते. २० गावात पाणी पुरवठ्यासाठी २० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. जलयुक्त शिवार योजनेचा फायदा काही गावांना झाला आहे. त्यात साखरखेर्डा यशस्वी ठरले आहे. उमनगाव आणि जयपूर या दोन गावात टँकरची मागणी असून, प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आले आहेत.