शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

मुद्रांक शुल्कामध्ये सुट दिल्याने व्यवहारात दुपटीने वाढ- उमेश शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 22:52 IST

मुद्रांक शुल्क अधिकारी उमेश शिंदे यांच्याशी साधलेला संवाद.

बुलढाणा: मुद्रांक शुल्कामध्ये ३१ डिसेंबर २०२० पर्यंत तीन टक्के सुट दिल्याने जिल्ह्यात मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारात दुपटीने वाढ झाली आहे. कोरोना संसर्गाच्या या काळात यामुळे अर्थकारणाला चालना मिळाली आहे. त्यासंदर्भाने मुद्रांक जिल्हाधिकारी उमेश शिंदे यांच्याशी साधलेला संवाद.

मुद्रांक शुल्कामध्ये दिलेल्या सवलतीमुळे किती कोटींचा महसूल मिळाला?मुद्रांक शुल्कामध्ये तीन टक्के सुट दिल्यामुळे सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात ३२ कोटी ३१ लाख ७३ हजार ४४५ रुपयांची उलाढाल झाली. यातून महसूलही मोठ्या प्रमाणावर मिळाला आहे.

यामुळे बक्षीसपत्रांच्या संख्येत वाढ झाली का?होय. जिल्ह्यात बक्षीसपत्रांच्या संख्येत वाढ झाली आहे. २५ टक्क्यांनी या व्यवहारांचे गेल्या तीन महिन्यात प्रमाण वाढले. प्रामुख्याने रक्ताच्या नात्यातील भाऊ, बहीण, पत्नी, पती, मुलगा, मुलगी, नातू, नात यांच्यामध्ये वर्षानुवर्षे रखडलेले व्यवहार यामुळे मार्गी लागले. विशेष म्हणजे यामध्ये अवघेय २०० रुपये मुद्रांक शुल्क व २०० रुपये नोंदणी फीच्या आधारावर हे व्यवहार झाले. त्यातही पालिका आणि जिल्हा परिषदेला अशा व्यवहारात द्यावा लागणारा १ टक्के सेसही बंद असल्याने नागरिकांनी या योजनेचा चांगला लाभ घेतला.

खरेदी खतामध्ये किती वाढ झाली?खरेदी खताचेही व्यवहार ३० टक्क्यांनी वाढले. त्याचा फायदा मालमत्तांचे व्यवहार करणाऱ्यांनी घेतला. निम्म्यापेक्षा कमी मुद्रांक शुल्क लागत असल्याने हे व्यवहार वाढले होते. यातही पालिका आणि जिल्हा परिषदेला द्यावा लागणारा सेस बंद असल्यामुळे व्यवहार करणाऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. तसेच व्यवहारांची संख्याही दुप्पट झाली.

गृहनिर्माण क्षेत्राला काही फायदा?गृहनिर्माण क्षेत्रातही याचा मोठा फायदा झाला आहे. प्रामुख्याने खामगाव, चिखली, बुलडाणा या शहरांमध्ये त्याचे दृश्यपरिणाम समोर आले आहेत. एका अंदाजानुसार जिल्ह्यात २०० कोटी रुपयांची गृहनिर्माण क्षेत्रात उलाढाल होत असते. मुद्रांक शुल्कामध्ये दिलेली सुट पाहता याचाही अनेकांनी लाभ घेतला.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत