शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठला काेराेनाची तिसरी लाट येऊ देऊ नकाे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:22 IST

देऊळगांव कुंडपाळ : विठ्ठला, कोरोनाची तिसरी लाट येऊ देऊ नकोस, असे साकडे आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी २० जुलै ...

देऊळगांव कुंडपाळ : विठ्ठला, कोरोनाची तिसरी लाट येऊ देऊ नकोस, असे साकडे आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी २० जुलै राेजी आषाढी एकादशी निमित्ताने घातले. विठ्ठल रखुमाईची त्यांचे हस्ते सपत्निक महापूजा झाली. यावेळी मंदिराचे संस्थापक तुळशीदास महाराज सरकटे, ओतुरकर, शिवछत्र मंडळाचे अध्यक्ष नंदू मापारी, शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, सरपंच शेषराव डोंगरे, ग्रामसेवक लक्ष्मण जायभाये, उपसरपंच विष्णू सरकटे, भागवत नरवाडे, सतीश राठोड, आश्रुजी सरकटे, विष्णू जायभाये, शिरुभाऊ मापारी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक तुळशीदास महाराजांनी केली. आषाढी एकादशीनिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी बबन महाराज ढाकणे आणि सहकारी यांनी काकडा भजन, त्यानंतर आ.डॉ.संजय रायमुलकर व रंजनाताई रायमुलकर यांच्या हस्ते विधिवत विठ्ठल-रखुमाईची महापूजा, त्यानंतर सुदाम महाराज पानेगांवकर यांचे जाहीर हरीकीर्तन झाले़ व डॉ.महाजन, मुंबई ‍व शिरुभाऊ मापारी यांचे वतीने फराळ व केळी वाटप करण्यात आले. यावेळी शेकडो विठ्ठलभक्तांनी विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थही उपस्थित हाेते.

आमदारांनी केली दोन सभामंडपांची घाेषणा

आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी आमदार निधीतून विठ्ठल-रखुमाई मंदिरासाठी एक व साखरतळे देवी संस्थानसाठी एक असे दोन सभामंडप देण्याची घोषणा केली, तसेच डॉ़.अमोल सरकटे यांनी वझर आघाव रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले असता, रस्ताही मंजूर असून, लवकरच काम सुरू होईल, असे आमदार रायमुलकर यांनी सांगितले.