शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

गावात पुन्हा पेटल्या चुली ग्रामीण भागातील महिलांना चूल आणि धूरमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडरचे वाटप केले. ...

गावात पुन्हा पेटल्या चुली

ग्रामीण भागातील महिलांना चूल आणि धूरमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडरचे वाटप केले. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला चुलीकडून गॅस सिलिंडरकडे वळल्या होत्या.

मात्र मागील सहा महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ते सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. सुरुवातीला ४०० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना आता ९०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे अनेकांनी गॅस सिलिंडरचा वापर बंद करीत पुन्हा चुलीकडे मोर्चा वळविला आहे.

खर्च कसा भागवायचा?

कोरोनामुळे आधीच रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात केली आहे. अशात पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सुरुवातीला ४०० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता ९०० रुपये मोजावे लागत आहेत.

यामुळे महिनाभराच्या खर्चाचा ताळमेळ जुळविताना चांगलीच दमछाक होत आहे.

- प्रशिता इंगळे, गृहिणी.

वाढत्या महागाईमुळे आधीच गृहिणींचे बजेट बिघडले आहे. त्यातच आता गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ केली जात असल्याने पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ आली आहे. उत्पन्न नसून महागाईत मात्र सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने किमान गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याची गरज आहे.

- कोमल पवार, गृहिणी.

फेब्रुवारी महित्यात उच्चांकी वाढ

यंदा फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये उच्चांकी वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरच्या किंमती तब्बल ११० रुपयांनी वाढल्याने ६६४ रुपयांच्या सिलिंडरसाठी तब्बल ७६९ रुपये मोजावे लागले आहेत, त्यानंतरही दरवाढ कायम असल्याने अनेकांनी चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.