शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना केवळ पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोना महामारीमुळे रेल्वेची थांबलेली चाके पुन्हा धावायला लागली आहेत. मात्र, आरक्षण करून रेल्वेचा प्रवास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : कोरोना महामारीमुळे रेल्वेची थांबलेली चाके पुन्हा धावायला लागली आहेत. मात्र, आरक्षण करून रेल्वेचा प्रवास करावा लागत आहे. परिणामी लोकल गाड्या कमीच असल्याने फक्त कोरोना पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यातील शेगाव रेल्वेस्थानकातून सध्या विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, निजामुद्दीन एक्स्प्रेस, अहमदाबाद एक्स्प्रेस, समता एक्स्प्रेस गाड्यांचे येणे-जाणे होत आहे. मुंबई-हावडा या मार्गावर प्रवाशांची मोठी लगबग असते. शेगाव रेल्वेस्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करीत आहेत. मग पॅसेंजर गाड्या का बंद आहेत, याचे उत्तर दिले जात नाही, हेच एक न उलगडणारे कोडे आहे. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने प्रवाशांना मात्र तिकिटांचा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात येत आहे.

सध्या सुरू असलेल्या एक्सस्प्रेस

विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, निजामुद्दीन एक्स्प्रेस, अहमदाबाद एक्स्प्रेस

सध्या एकही स्पेशल ट्रेन सुरू नाही

शेगाव रेल्वेस्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. या रेल्वेस्थानकातून ३४ रेल्वेगाड्या धावत असतात. पॅसेंजर नसल्याने अडचण होते.

प्रवाशांना बसतो भुर्दंड

विशेष रेल्वेगाड्यांच्या नावाखाली प्रवाशांची लूट सुरू आहे. परिणामी हा आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची नितांत गरज आहे. कोरोनाची धास्ती न बाळगता प्रवाशांचे हितही लक्षात घेणे गरजेचे आहे.

एक्सप्रेसचा प्रवास परवडत नाही. रेल्वेचा प्रवास पुन्हा सुरू केला आहे. सर्वसाधारण प्रवाशांना लोकल भाडे आकारायला हवे. मात्र, विशेष रेल्वेगाड्यांच्या नावावर प्रवास तिकीट दुप्पट घेतले जात आहे, याचा आम्हाला फटका बसत आहे.

- राजेश बुजाडे, प्रवासी

लोकल गाडीने स्वस्तात प्रवास करता येते. एक्सप्रेस गाडीचे तिकीट दुपटीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसतो. या मार्गावर पॅसेंजर रेल्वेची संख्या वाढवायची गरज आहे. रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

- आकाश टेकाडे, प्रवासी