शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस घेण्याची वाटतेय भीती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:51 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : काेराेना संसर्गाचा प्रभाव कमी करण्यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात आराेग्य कर्मचाऱ्यांना ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : काेराेना संसर्गाचा प्रभाव कमी करण्यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. मात्र, प्रथमच वापर हाेत असलेल्या या लसीमुळे साइड इफेक्ट हाेण्याची भीती काही डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचे चित्र आहे. ४० टक्के आराेग्य कर्मचारी लसीकरणासाठी तयार असल्याचे चित्र आहे.

सर्वात प्रथम हेल्थ वर्करमध्ये डॉक्टर, नर्सेस, सर्व खासगी डॉक्टर्स, त्यांचा स्टाफ, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाइन वर्कर यामध्ये कोविड कालावधीत काम केलेले पोलीस अधिकारी-कर्मचारी, महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य विभागांतील अधिकारी व कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील सर्व लोक, त्यानंतर चौथ्या टप्प्यात ५० वर्षांच्या आतील दुर्धर आजार असलेले नागरिक यांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी को-विन ॲपवर नोंदणी करण्यात येत आहे. शासकीय डाॅक्टर आणि आराेग्य कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत १०० टक्के नाेंदणी केली आहे. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अंतर्गत १ हजार ८२५, तर जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांच्या अंतर्गत येत असलेल्या ८ हजार ६७० डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच खासगी ३ हजार ९५४ पैकी २० टक्के कर्मचाऱ्यांची नाेंदणी अजूनही शिल्लक आहे. काेराेनाचा प्रभाव कमी झाला आहे, त्यामुळे लस घ्यावी किंवा नाही याविषयी काही आराेग्य कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचे चित्र आहे. तसेच प्रथमच लसीकरण हाेत असल्याचे त्याचे दुष्परिणाम हाेण्याची भीती काही कर्मचाऱ्यांना वाटत आहे.

डॉक्टर, कर्मचाऱ्यांची काय भावना

काेराेना लस प्रथमच देण्यात येत असल्याने त्याचे साइड इफेक्टविषयी कुणालाही माहिती नाही. तसेच काेराेना रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे, लस घ्यावी किंवा नाही याविषयी काही कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

काेराेना लसीकरणाविषयी डाॅक्टरांसह आराेग्य कर्मचाऱ्यांमध्ये कुठलीही भीती नाही. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच सदस्यांनी नाेंदणी केली आहे. काेराेना लस घेण्यासाठी आम्ही तयार आहाेत.

- डाॅ. जयसिंग मेहेर, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन

प्रशासनाची जय्यत तयारी

लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. वेळाेवेळी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद यांनी २९ डिसेंबर राेजी आढावा बैठकीत सादरीकरणही केले आहे. ‘लसीकरण कसे राहणार’ याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली हाेती.