शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा मुलांना घ्यायचा असतो की, मुलांच्या आई-वडिलांना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST

बुलडाणा : समाजातील हुंडा पद्धत मोडली जावी म्हणून ६० वर्षांपूर्वी अमलात आणलेल्या कायद्याच्या चाकोरीत आजही लोक अडकत आहेत. हुंडा ...

बुलडाणा : समाजातील हुंडा पद्धत मोडली जावी म्हणून ६० वर्षांपूर्वी अमलात आणलेल्या कायद्याच्या चाकोरीत आजही लोक अडकत आहेत. हुंडा मागणे हा समाजाला लागलेला कलंक मिटविण्यासाठी कडक कायद्यांची निर्मिती झाली असली, तरी या कायद्याला न जुमानता हुंडा मागण्याची प्रथा सुरूच आहे.

काळानुसार हुंडा मागण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे़ हुंडा आता पैशाच्या रूपाने किंवा साहित्याच्या रूपाने मागितला जात आहे. हुंडा स्वीकारण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. हुंडा देण्यास मुलीचे वडील सक्षम नसले, तर त्यांच्या मुलीचे लग्न हुंड्यापायी मोडले जात आहे. लग्न करताना नवऱ्या मुलाला जणू मुलीचे वडील हुंडा रूपाने जणू विकतच घेत आहेत. जिल्ह्यात हुंड्याची परंपरा फारशी नसली, तरीही हुंडा मागत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत.

लग्नात मनासारखे दागिने मिळाले नाही किंवा पैशांच्या हव्यासापाेटी विवाहितेचा सासरकडील मंडळी छळ करतात़ जिल्ह्यात हुंड्यासाठी छळाचे अडीच वर्षांत १३७ तक्रारी दाखल झाल्या आहेत़ यामध्ये २०१९ मध्ये २६, २०२० मध्ये ६३ तर जुलै २०२१ पर्यंत ४८ तक्रारींचा समावेश आहे़

हुंडा विराेधी कायदा काय ?

हुंडा प्रतिबंधन कायदा १९६१ च्या कलम ३ अन्वये हुंडा देण्याबद्दल किमान पाच वर्षे कारावास आणि कमीत कमी पाच हजार हजार अथवा अशा हुंड्याच्या मूल्याइतकी रक्कम इतक्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

मुलांच्या मनात काय ?

समाजात सुरू असलेली हुंडा पद्धती चुकीचीच आहे़ मुलांना शिक्षण दिले, नाेकरीवर लावले त्याचा माेबदला मुलींच्या वडिलांकडून घेणे हे याेग्य नाही़ त्यामुळे, हुंडा घेण्याची पद्धत बंद करण्याची गरज आहे़

संदेश जाधव, युवक

आधुनिक काळातही हुंडा घेण्याची सुरू असलेली प्रथा चुकीची आहे़ हुंडा घेणे हा गुन्हा असूनही अनेक जण सर्रास हुंड्याची मागणी करतात़ मुलाला नाेकरी लावल्याचा माेबदला मुलीच्या वडिलांना मागणे चूकच आहे़

अनिरुद्ध इंगळे, युवक

मुलांच्या पालकांना काय वाटते

नोकरीवाला मुलगा नोकरदार मुलीला पसंती देतो. वधूपक्ष धूमधडाक्यात लग्न करतो. लग्नातील स्त्रीधन शेवटी मुलीच्याच अंगावर राहते. मग, ते वधूपक्ष स्वेच्छेने देत असल्यास बिघडले कुठे?

- एक पालक

पालकांनीही हुंड्याचा प्रखर विरोध करायला हवा. आजची तरुणार्ई देखील हुंड्याच्या भानगडीत फारशी पडत नाही, असा माझा अनुभव आहे. स्त्रीधनाचा वापर वा मागणी मोठ्या रकमेच्या हुंड्यात व्हायला नकाे़

- एक पालक

मुलींच्या मनात काय

हुंडा घेणे व देणे दाेन्ही चूक आहे़ मुलगी वस्तू नाही़ त्यामुळे, मुलींच्या पालकांनीही हुंडा देऊच नये़ मुलीला सासरकडे सन्मान मिळावा़ हुंड्यासासाठी मुलींचा छळ करणे चुकीचे आहे़

एक मुलगी

हुंड्यामुळे अनेक मुलींचे लग्न जुळत नाही नाेकरीवर असलेल्या मुलांचे हुंड्याचे भाव माेठ्या प्रमाणात वाढले आहेत़ त्यातच सर्वसामान्य घरातील मुलींचे लग्न जुळवताना पालकांना कसरत करावी लागते़

एक मुलगी

मुलीच्या पालकांना काय वाटते

मुलांची नाेकरी पाहून हुंड्याची मागणी करण्यात येते़ मुलीला चांगला मुलगा, घर मिळावे, यासाठी मुलींचे वडील हुंडा देण्यासाठी तयारही हाेतात़ मात्र, अलीकडच्या काळात हुंड्याची रक्कम वाढली आहे़ त्यामुळे, लग्न जुळवताना कसरत करावी लागते़

एक मुलीचे पालक

शासनाने कितीही कायदे केले तरी समाजाची मानसिकता बदलत नाही, ताेपर्यंत हुंडा पद्धत बंद हाेणार नाही़ नाेकरीवर असलेल्या मुलांना डिमांड असल्याने हुंडा पद्धत टिकून आहे़ ही प्रथाच बंद व्हायला पाहिजे़

एक मुलीचे पालक