शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

भारतीय लोकशाही लुळी, पांगळी करू नका;  दिव्यांग मतदारांचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 15:45 IST

खामगाव: एकीकडे अनेक धडधाकट तरूण मतदानाबाबत पाहिजे तेवढे गंभीर नसताना, दुसरीकडे खामगाव शहरासह संपुर्ण विधानसभा मतदारसंघात अनेक दिव्यांग बांधवांनी स्वत: मतदान करत एक आदर्श  प्रस्थापित केला.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: एकीकडे अनेक धडधाकट तरूण मतदानाबाबत पाहिजे तेवढे गंभीर नसताना, दुसरीकडे खामगाव शहरासह संपुर्ण विधानसभा मतदारसंघात अनेक दिव्यांग बांधवांनी स्वत: मतदान करत एक आदर्श  प्रस्थापित केला. मतदान हेच लोकशाहीचे बळ असून त्याकडेच पाठ फिरवून लोकशाही लुळी, पांगळी करू नका, असे भावनिक आवाहनच यानिमित्ताने त्यांनी केल्याचे दिसून आले.सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. यात गुरूवारी सकाळपासून महाराष्ट्रात १० लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरूवात झाली. त्यानुषंगाने बुलडाणा लोकसभा मतदारसंघात दिव्यांग मतदात्यांचा उत्साह पाहायला मिळाला. विशेष करून खामगाव शहर व तालुक्यातील मतदान केंद्रांवर दिव्यांग बांधवांचा मतदानाबाबत उत्साह वाखाणण्याजोगा होता. खामगाव शहरातील शाळा क्रमांक ९ मध्ये मतदान केंद्र १७३ वर सकाळी १०.३० वाजता अरूण देशमुख हे दिव्यांग मतदार मतदान करायला आले. त्यांचे दोन्ही पाय पोलिओमुळे निकामी झाले आहेत. असे असतानाही त्यांचा मतदानाबाबतचा उत्साह कमालीचा आहे. त्यांनी मतदानाचा आग्रह धरला. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांनी तसेच स्वयंसेवकांनी त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवले. मतदानाचा हक्क बजावून केंद्राबाहेर आल्यानंतर त्यांनी सर्वांनाच मतदान करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)

खामगाव विधानसभा मतदारसंघात ९७४ मतदार!खामगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ९७४ दिव्यांग मतदार आहेत. यापैकी खामगाव शहरातील दिव्यांग मतदारांची संख्या १२४ एवढी आहे. दुपारी सुमारे साडेबारा वाजेपर्यंत खामगाव शहरात ४६ दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

‘विराट’, स्वयंसेवकांनी दिले ‘बळ’!खामगाव शहरात दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी विराट दिव्यांग फाऊंडेशनचे मनोज नगरनाईक यांच्यासह पदाधिकाºयांनी मदत केली. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष स्वयंसेवकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत उत्साह दिसून येत आहे. 

 लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान हा एकमेव मार्ग आहे. हा हक्क प्रत्येकानेच बजावावा. मतदानाकडे कानाडोळा करून ही व्यवस्था अधु करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.       -  अरूण देशमुख,        दिव्यांग मतदार, अभय नगर खामगाव.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbuldhana-pcबुलडाणा