शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

आवाज कराल मोठा तर वापरू ‘नोटा’!

By admin | Updated: November 16, 2016 05:27 IST

शहरात सध्या नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, जागोजागी प्रचाररथ फिरत आहेत. मात्र, प्रत्येक चौकात एकापाठोपाठ एक असे चार ते पाच प्रचाररथ येऊन थांबत असल्याने

सुधीर चेके-पाटील/ चिखली (बुलडाणा)शहरात सध्या नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, जागोजागी प्रचाररथ फिरत आहेत. मात्र, प्रत्येक चौकात एकापाठोपाठ एक असे चार ते पाच प्रचाररथ येऊन थांबत असल्याने, या ध्वनिक्षेपकाद्वारे होणाऱ्या कर्णकर्कश गोंगाटामुळे शहरवासी पार वैतागले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी उमेदवारांचे हे प्रचारकार्य डोकेदुखी ठरत असल्याने, मतदारांकडून ‘नोटा’चा (चलनातून बाद झालेल्या हजार-पाचशेच्या नोटा नव्हे, तर मतदार यंत्रावरील ‘नोटा’ ही पर्यायी सुविधा) वापर होण्याची दाट चर्चा मतदारांमध्ये ऐकावयास मिळत आहे. चिखली नगरपालिका निवडणुकीचा मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण जोरदार तापू लागले आहे. या निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्वच उमेदवारांकडून प्रचारामध्ये आघाडी घेण्यासाठीची चढाओढ लागली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून प्रचार रथाद्वारे ध्वनिक्षेपकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शहरातील १३ प्रभागांतून २६ जागांसाठी, तसेच नगराध्यक्षपदासाठी असे एकूण ११६ उमेदवार नशीब अजमावत आहेत. येत्या २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.