शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओलावा नसल्यास तणनाशक फवारू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

मेहकर : तालुक्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून, जवळपास ७० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते. त्यामुळे सोयाबीन ...

मेहकर : तालुक्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून, जवळपास ७० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते. त्यामुळे सोयाबीन पिकात तणनाशक मोठ्या प्रमाणात फवारण्यात येते. जमिनीत ओलावा नसल्यास तणनाशक फवारणी करणे घातक ठरू शकते. याकरिता तणनाशक खरेदी व फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे़

पाऊस वेळेवर झाल्यामुळे पेरणी वेळेवर झालेली आहे. पेरणी करून जवळपास १० ते २० दिवस आटोपलेले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तण नियंत्रणाची घाई होते. काही शेतकऱ्यांनी तर तणनाशक फवारणीस सुरुवातसुद्धा केलेली आहे. तणनाशक खरेदी करताना काळजी घ्यावी. अनोळखी व्यक्ती किंवा रस्त्यावर विनापरवाना तणनाशकाची खरेदी करू नये. तणनाशक खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. पूर्ण हंगामाकरिता आवश्यक तेवढेच तणनाशक खरेदी करावे. खरेदीपूर्वी तणनाशकाचे पॅकिंगवरील लेबल पाहावे व मुदतबाह्य तणनाशक खरेदी करू नये. व्यवस्थित पॅकिंग असलेले तणनाशक खरेदी करावे. तणनाशक फवारताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. जमिनीत ओलावा असल्यानंतरच तणनाशकाची फवारणी करावी. पीकनिहाय शिफारस केलेल्या व आवश्यक तीव्रतेच्याच तणनाशकाची फवारणी करावी. फवारणी करताना गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणी वापरावे. तणनाशकाचे द्रावण करताना हाताने ढवळू नये व कीटकनाशकाचे मिश्रण करू नये. शक्य असेल तेवढेच द्रावण करावे. शिल्लक द्रावण तयार करून ठेवू नये. फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, नाकावर मास्क, आदींचा वापर करावा. उघड्या अंगाने फवारणी करण्याचे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे़

काेट

पूर्वी तणनाशक फवारणी करताना शेतकरी नॅपसॅक स्प्रेअर किंवा पॉवर स्प्रेअरचा वापर करीत़; त्यामुळे आपण कोणते तणनाशक फवारणी केले याची माहिती असे; परंतु आता ट्रॅक्टरचलित स्प्रेअरचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ट्रॅक्टरमालक एकच स्प्रेअर उगवणपूर्व तणनाशक फवारणीसाठी व उगवणीनंतर वापरावयाचे तणनाशक फवारणीसाठी वापर करीत आहे. त्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्प्रेअरची टाकी फवारणीअगोदर स्वच्छ धुऊन घ्यावी.

- सुधाकर कंकाळ, मंडल कृषी अधिकारी, मेहकर