शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचा नैसर्गिक हक्क हिरावून घेऊ नका!

By admin | Updated: January 25, 2016 02:22 IST

राष्ट्रीय बालिका दिनी ‘संकल्प लेकीचा’ अभियानाला सुरुवात.

बुलडाणा : माणूस म्हणून जन्माला येण्याचा अधिकार प्रत्येक मुलीला असून, गर्भलिंग निदानानंतर गर्भपात करून तिचा तो नैसर्गिक हक्क हिरावून घेऊ नका, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते वर्षाताई देशपांडे यांनी केले. स्त्री जन्मदर कमी असण्याच्या लांच्छनास्पद बाबीमध्ये महाराष्ट्रात बुलडाणा जिल्ह्याचा चौथा क्रमांक असून, आता या जिल्ह्यात प्रबोधनापेक्षा स्टिंग ऑपरेशन करून भंडाफोड करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित करुन दरवर्षी सोनोग्राफीच्या माध्यमातून महाराष्ट्रात ६ लाख मुली गर्भातूनच गायब केल्या जातात, अशी खळबळजनक माहितीही यावेळी दिली. बुलडाणा जिल्हा परिषद तथा लेक माझी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बालिका दिनाच्या पर्वावर रविवार, २४ जानेवारी रोजी स्थानिक जिजामाता प्रेक्षागारावर संकल्प लेकीचा या जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून वर्षाताई देशपांडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा अलकाताई खंडारे होत्या. जिल्हाधिकारी विजय झाडे यांनीही बुलडाणा जिल्ह्यातील घटत्या स्त्री जन्मदरावर चिंता व्यक्त करुन यासाठी प्रशासकीय पातळीवर कठोर पावले उचलण्याची हमी दिली. प्रारंभी आढावा डॉ. अर्चना वानेरे यांनी घेऊन या प्रबोधनात्मक चळवळीच्या माध्यमातून झालेल्या सकारात्मक कार्याची माहिती दिली. प्रास्ताविकातून दीपा मुधोळ यांनी हे अभियान जरी प्रशासनाच्या माध्यमातून राबविले जात असले तरी त्यात जनतेचा सहभाग महत्त्वाचे असल्याचे नमूद करत ही लोकचळवळ झाली पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली. १0 ऑक्टोबर रोजी जागतिक कन्या दिनाच्या दिवशी जिल्हाभर प्रबोधनात्मक फेर्‍या निघाल्या, तर २४ जानेवारी या राष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी हा उद्बोधनात्मक कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगून, ही फक्त सुरुवात आहे, आता हा उपक्रम वर्षभर चालणार आहे.