शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थिनींना मिळणार विद्यावेतन

By admin | Updated: September 6, 2016 02:09 IST

दिव्यांग विद्यार्थिनींचे दरमहा २00 रुपये ऑनलाइन जमा होणार!

खामगाव (जि. बुलडाणा), दि. ५ : शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दिव्यांग विद्यार्थ्यांंना टिकवून ठेवण्यासाठी शासनाच्यावतीने इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंंतच्या विद्यार्थिनींना शैक्षणिक वर्ष २0१६-१७ पासून विद्यावेतन मिळणार आहे. दरमहा २00 रुपये प्रमाणे वार्षिक दोन हजार रुपये रक्कम विद्यार्थिनींच्या खात्यात ऑनलाइन जमा होणार आहे.शिक्षणाचा बालहक्क कायदा २00९ अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांंना शिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांंचा शाळेकडे ओढा कायम राहण्यासाठी शासनाच्यावतीने मोफत पाठय़पुस्तके, मोफत गणवेश, विविध शिष्यवृत्या देण्यात येत आहेत. सामान्य विद्यार्थ्यांंप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थीही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी सर्व शिक्षा अभियानच्यावतीने या विद्यार्थ्यांंची विशेष काळजी घेतल्या जात आहे. वर्ग १ ते ८ पर्यंंतच्या सर्व प्रवर्गाच्या ४0 टक्के दिव्यांगांचे प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांंना मदतनीस व प्रवास भत्ता म्हणून दरमहा २५0 रुपये प्रमाणे २५00 रुपये वार्षिक दिले जातात. यासोबत दिव्यांग विद्यार्थ्यांंची आरोग्य तपासणी होऊन गरजवंतांना श्रवणयंत्र, कॅलीपर, व्हीलचेअर, ब्रेल किट, तीन चाकी सायकल, अंधकाठी असे साहित्य देण्यात येत आहे.वर्ग १ ते ८ पर्यंंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांंंना लाभ दिल्या जात असताना इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांंनाही हा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने शैक्षणिक वर्ष २0१६-१७ पासून केवळ दिव्यांग विद्यार्थिनींना दरमहा २00 रुपये विद्यावेतन देण्याचे धोरण ठरविले आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या दिव्यांग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत सन २0१५-१६ च्या यू डायस आधारभूत माहितीच्या अनुषंगाने शाळा दाखल असलेल्या सर्व दिव्यांग प्रवर्गातील दिव्यांग विद्याथ्यार्ंची शाळेतील उपस्थिती टिकवणे त्यांना शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सहाय्यभुत व्हावे, याकरिता प्रोत्साहनपर भत्ता म्हणून विद्यावेतन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३१९ विद्यार्थिनींना मिळणार लाभदिव्यांग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत माध्यमिक इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंंंतच्या दिव्यांग विद्या िर्थनींना प्रतिवर्षी दोन हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ३१९ विद्यार्थिनींचा समावेश असून, खामगाव तालुक्यातील ८८ लाभार्थींंं आहेत. विद्यावेतनाचा लाभ लाभार्थ्यांंंच्या बँक खात्यात जमा होत असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांंंचे खाते क्रमांक संबंधित तालुक्याच्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयात जमा करावयाचे आहेत.