शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

‘जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:35 IST

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण संकट पावसाअभावी निर्माण झाले आहे. त्यामुळे तातडीने सद्यस्थितीवर आधारित मुदतपूर्व दुष्काळ जाहीर करावा व विविध समस्यांच्या अनुषंगाने विनाविलंब उपाययोजना महाराष्ट्र शासनाने कराव्यात, अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्राचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना २0 ऑगस्ट रोजी शेतकरी बचाओ आंदोलनाच्यावतीने संयोजक भाई रजनीकांत यांनी सादर केले.

ठळक मुद्देकृषी मंत्र्यांकडे मागणी आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण संकट पावसाअभावी निर्माण झाले आहे. त्यामुळे तातडीने सद्यस्थितीवर आधारित मुदतपूर्व दुष्काळ जाहीर करावा व विविध समस्यांच्या अनुषंगाने विनाविलंब उपाययोजना महाराष्ट्र शासनाने कराव्यात, अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्राचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना २0 ऑगस्ट रोजी शेतकरी बचाओ आंदोलनाच्यावतीने संयोजक भाई रजनीकांत यांनी सादर केले. यावेळी भाई रजनीकांत यांनी विविध मुद्यांचे अनुषंगाने कृषी मंत्र्यांशी चर्चा केली.  पालकमंत्र्यानी शेगाव तीर्थक्षेत्रासह जिल्ह्यातील सर्व अवैध दारू बंद करण्याचीही मागणी करण्यात आली. निवेदनात यावर्षीच्या दुष्काळामुळे वर्ष २0१७-१८ पर्यंतचे कर्ज  माफ करावे व शेती व्यवसायासाठी यापुढे सरकारने स्वत: तगाई द्यावी. पुढील खरीप हंगाम २0१८-१९ ची पिके हाती येईपर्यंत दुष्काळी परिसरातील शेतकरी कुटुंबास रेशन दुकानातून आवश्यक धान्य गहू, तांदूळ, डाळ, साखर द्यावे व खर्चाकरिता किमान पाच हजार रुपये दरमहा खावटी अनुदान द्यावे. पेरणी न झालेल्या व दुबार-तिबार पेरणीची नोंद घेण्यात येऊन त्यांना २५ हजार रुपयांची भरपाई मिळावी, पिण्याच्या पाण्यासह वर्षभर गुरांना चारा व्यवस्था व्हावी तसेच मजुरांना तातडीने रोजगार हमी कामे आठ दिवसांत मंजुरी मिळेल, अशी तरतूद करण्यात यावी. जिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या व्यसनमुक्ती समित्या पालकमंत्र्यांनी त्वरित गठित कराव्यात, याबाबत शासनाने पाऊल न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला. निवेदन देताना राजेंद्र सित्रे, रत्नमाला गवई, राजेंद्र गवई, रमेश गाडेकर, देवीदास डांगे, प्रभाकर सरोदे, सचिन महाजन, डॉ.यशवंत वानखडे, अँड.वीरेंद्र झाडोकार आदी शेतकरी बचाओ आंदोलनाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.