शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकाला जिल्हाधिकारीच जबाबदार : आमदार फुंडकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 19:36 IST

नियोजन शून्य धोरण कारणीभूत असल्याचा सणसणाटी आरोप भाजप जिल्हाध्यक्ष आ. अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी येथे केला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाला जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांचे उदासिन आणि नियोजन शून्य धोरण कारणीभूत असल्याचा सणसणाटी आरोप भाजप जिल्हाध्यक्ष आ. अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी येथे केला.खामगाव येथील विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेवर हल्लाबोल चढविला. कोरोना आपातकालीन परिस्थितीत आपल्यासह जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी स्थानिक विकास निधीतून २३१ कोटी रूपयांचा निधी दिला. तर खामगाव येथील सामान्य रूग्णालयात कोव्हीड-१९ साथरोगामध्ये तपासणी करीता ‘ट्रू लॅब क्वाट्टरो’ मशीन उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त २० लक्ष रुपये दिलेत. मात्र, ही मशीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक गंभीर नाहीत. कोरोना आपातकालीन परिस्थितीत तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये विविध सुविधा उपलब्ध नाहीत. कोरोना आपातकालीन परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांना वाºयावर सोडणाºया जिल्हाधिकाºयांनी आपल्या बंगल्यात अनेक सुविधा नियमबाह्य पध्दतीने उपलब्ध करून घेतल्या.  याचे आॅडीट केले जावे. नियोजन शून्य कारभारामुळे अकोलापेक्षाही त्या जिल्ह्याची अतिशय बिकट परिस्थिती करून जातील,  यावेळी आ.  फुंडकर यांनी केला.

 राजपत्रित अधिकारी दबावात!कोरोना आपातकालीन परिस्थितीत राजपत्रित अधिकाºयांसोबतच जिल्हा पोलिस अधिक्षक आणि इतर अधिकारी दबावात आहेत. जिल्हाधिकाºयांच्या अतिरिक्त मानसिक त्रासामुळे आगामी काळात काही अघटीत घडणार असल्याची भीती आहे. लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठांचे ऐकण्याची त्यांची मनस्थिती नसल्याने तक्रार करून हक्कभंग आणणार असल्याची भूमिका फुंडकर यांनी मांडली.

 जिल्हाधिकारी म्हणतात नो कमेंट!यासंदर्भात जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांच्याशी संपर्क साधला असता, आपण याबाबत प्रतिक्रीया देऊ इच्छीत नसल्याचे त्या ‘लोकमत’शी बोलताना म्हणाल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा