शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिस अैाषधी वितरणावर आता जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:34 IST

बुलडाणा : कोरानाबाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर, टोसिलिझुआन अैाषधानंतर आता म्युकरमायकोसिसच्या इलाजासाठी आवश्यक असलेले ॲफ्कोटेरीसीन या अैाषधाचेही वितरण जिल्हाधिकारी ...

बुलडाणा : कोरानाबाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर, टोसिलिझुआन अैाषधानंतर आता म्युकरमायकोसिसच्या इलाजासाठी आवश्यक असलेले ॲफ्कोटेरीसीन या अैाषधाचेही वितरण जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या नियंत्रणात घेतले आहे. म्युकरमायकोसिस आजाराच्या अैाषधांचाही काळाबाजार होण्याची तथा त्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता पाहता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी या अैाषधांचे वाटप हे प्रशासनाच्या नियंत्रणात घेतले आहे.

मुळातच म्युकरमायकोसिसच्या इलाजासाठी आवश्यक असलेली औषधी व इंजेक्शन ही महागडी आहेत. किमान दोन हजार रुपये ते २० हजार रुपयांपेक्षाही अधिक किमतीचे हे इंजेक्शन आहे. त्यातील घटकानुसार या इंजेक्शनचीही किंमतही वाढत जाते. त्यातच वर्तमान स्थितीत त्याचा असलेला तुटवडा पाहता जिल्ह्यातही काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आता या इंजेक्शन वितरणाचे नियंत्रणही जिल्हा प्रशासनाकडे घेण्यात आले आहे. त्यातच या इंजेक्शनसाठी आवश्यक असलेले घटक किंवा कच्चा माल हा देशाला परदेशातून घ्यावा लागतो. बुरशीजन्य आजाराचे प्रमाण अलीकडील काळात वाढले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने रेमडेसिविरप्रमाणेच म्युकरमायकोसिसच्या आजारारामध्ये लागणारे इंजेक्शनही आपल्या नियंत्रणात घेतले असून केंद्र सरकार ते राज्य सरकारांना वितरण करणार आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावरही जिल्हाधिकारी यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून इंजेक्शन वितरणावरील नियंत्रण आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

--म्युकरमायकोसिसमुळे चार जणांचा मृत्यू--

बुलडाणा जिल्ह्यातही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या २७ पर्यंत पोहोचली असून, यातील चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच बुलडाणा जिल्ह्यात तीन रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत. या आजाराचा मृत्यूदर हा जवळपास ५० टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे या आजाराचे गांभीर्य वाढले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

--अैारंगाबाद, नागपूरमध्ये उपचार--

म्युकरमायकोसिसचा इलाज महागडा आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णांवर प्रामुख्याने अैारंगाबाद आणि नागपूर येथे उपचार करण्यात येत आहेत. एका रुग्णास किमान ४० इंजेक्शन द्यावे लागतात. त्यातच इंजेक्शनची कमी असलेली उपलब्धता पाहता बाहेर जिल्ह्यात रुग्णांवर उपचार करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. जळगाव जामोद तालुक्यातीलही एका रुग्णास २१ मे रोजी उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे.

--मेडिकल स्टोअर्सनेही नोंदवली मागणी--

म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनची वाढती मागणी पाहता बुलडाणा जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर्सनीही नागपूर येथील अैाषधी डेपोकडे जवपास २०० इंजेक्शनची मागणी नोंदवली असल्याची माहिती अन्न व अैाषध प्रशासन विभागातील सूत्रांनी दिली. दुसरीकडे राज्यात भिवंडी, पुणे आणि नागपूर येथे अैाषधी डेपो आहे. जिल्ह्यासाठी नागपूर सोयीस्कर असल्याने तेथे मागणी नोंदविण्यात येते.