शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिस औषधी वितरणावर आता जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 11:29 IST

Mucomycosis : ॲफ्कोटेरीसीन या अैाषधाचेही वितरण जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या नियंत्रणात घेत आहे. 

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरानाबाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर, टोसिलिझुआन अैाषधानंतर आता म्युकरमायकोसिसच्या इलाजासाठी आवश्यक असलेले ॲफ्कोटेरीसीन या अैाषधाचेही वितरण जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या नियंत्रणात घेत आहे. म्युकरमायकोसिस आजाराच्या अैाषधांचाही काळाबाजार होण्याची तथा त्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता पाहता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी या अैाषधांचे वितरण करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.मुळातच म्युकरमायकोसिसच्या इलाजासाठी आवश्यक असलेली औषधी व इंजेक्शन ही महागडी आहेत. किमान दोन हजार रुपये ते २० हजार रुपयांपेक्षाही अधिक किमतीचे हे इंजेक्शन आहे. त्यातील घटकानुसार या इंजेक्शनचीही किंमतही वाढत जाते. त्यातच वर्तमान स्थितीत त्याचा असलेला तुटवडा पाहता जिल्ह्यातही काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी  प्रशासकीय पातळीवर इंजेक्शन वितरणाचे नियंत्रणही घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच या इंजेक्शनसाठी आवश्यक असलेले घटक किंवा कच्चा माल हा  परदेशातून घ्यावा लागतो. बुरशीजन्य आजाराचे प्रमाण अलीकडील काळात वाढले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने रेमडेसिविरप्रमाणेच म्युकरमायकोसिसच्या आजारारामध्ये लागणारे इंजेक्शनही आपल्या नियंत्रणात घेतले असून केंद्र सरकार ते राज्य सरकारांना वितरण करणार आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावरही जिल्हाधिकारी यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून इंजेक्शन वितरणावरील नियंत्रण आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

म्युकरमायकोसिसमुळे चार जणांचा मृत्यूबुलडाणा जिल्ह्यातही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या २७ पर्यंत पोहोचली असून, यातील चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच बुलडाणा जिल्ह्यात तीन रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत. या आजाराचा मृत्यूदर हा जवळपास ५० टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे या आजाराचे गांभीर्य वाढले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसbuldhanaबुलडाणा