रविवारी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या अहवालांपैकी १ हजार ३१८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ३१० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये देऊळगाव राजातील दोन, नागणगाव येथील एक, सिनगाव जहाँगीर येथील एक, मढ १, चिखलीमधील गांधीनगरातील एक, किन्होळा एक, मलकापूरमधील गोकुळ धाममधील एकाचा समावेश आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैकी ७ लाख ४ हजार ३६९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान ८६ हजार ८०३ जणांनी कोरोनावर मात आजपर्यंत मात केली आहे. अद्यापही ७५० संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८७ हजार ५२४ झाली आहे. त्यापैकी ४८ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे जिल्ह्यात ६७३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.
--चाचण्यांचे प्रमाण घटले--
ऑगस्टपासून जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण घटले आहे. मात्र तरीही दररोज १८०० ते २००० संदिग्धांच्या तपासण्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत होत्या. मात्र गेल्या पाच ते सहा दिवसापासून या चाचण्यांचे प्रमाण घटले असून आता ७५० ते ८०० चाचण्याच केल्या जात आहे. तिसऱ्या लाटेचे संकट समोर असताना कोरोना संदिग्धांच्या चाचण्या करण्यात आरोग्य विभागात एक प्रकारे मरगळ आली आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.