शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २0९९ शेततळी झाली पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:36 IST

बुलडाणा : दुष्काळावर मात करण्यासह शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी शाश्‍वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २0९९ शेततळे पूर्ण झाले असून, गणेशाच्या आगमनाप्रसंगी आलेल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असून, शेततळे पाणीदार झाली आहेत. त्यामुळे खरीप हंगामासह रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.

ठळक मुद्देपावसाचा रब्बी हंगामाला फायदा जमिनीतील पाण्याची पातळी वाढली

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : दुष्काळावर मात करण्यासह शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी शाश्‍वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २0९९ शेततळे पूर्ण झाले असून, गणेशाच्या आगमनाप्रसंगी आलेल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असून, शेततळे पाणीदार झाली आहेत. त्यामुळे खरीप हंगामासह रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.शेती उत्पादनामध्ये शाश्‍वतता आणण्यासाठी आणि राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट आणि जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे आणि त्यातून संरक्षित व शाश्‍वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी शेततळी हा उपयुक्त पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे. या शेततळ्यांमुळे शेतकर्‍यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडित कालावधीत फायदा झाल्याचे दिसून आले आहे. या योजनेंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळे निश्‍चित करण्यात आली आहेत. त्यातील सर्वात मोठे शेततळे ३0 बाय ३0 बाय ३ मीटर तर सर्वात लहान शेततळ्यासाठी १५ बाय १५ बाय ३ मीटर असे आकारमान निश्‍चित करण्यात आले आहे. सर्वात मोठय़ा शेततळ्यासाठी जास्तीत जास्त ५0 हजार रुपये इतके अनुदान निश्‍चित करण्यात आले आहे, तर इतर शेततळ्यांसाठी त्यांच्या आकारमानानुसार अनुदान प्राप्त होणार आहे. अनुदानाशिवाय जास्तीचा खर्च शेतकर्‍याला करावा लागणार असून, शेतळ्याचे काम पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.  या योजनेसाठी जिल्ह्यात एकूण पाच हजार शेततळ्यांचा लक्ष्यांक ठेवण्यात आला होता. यासाठी आलेल्या ८ हजार ३५८ अर्जांतून ३ हजार ९८२ अर्जदार शेतकर्‍यांना शेततळे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ९४४ शेतकर्‍यांना शेततळ्याची आखणी करून देण्यात आली; मात्र  त्यापैकी २ हजार ९९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

१ हजार ९३४ शेततळ्यांचे अनुदान अदामागेल त्याला शेततळे योजनेंतर्गंत जिल्ह्यात यावर्षी २ हजार ९९ शेततळे पूर्ण झाले असून, या शेततळ्यांमध्ये पाणी आल्यामुळे शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार आहे, तर पूर्ण झालेल्या शेततळ्यांपैकी १ हजार ९३४ शेततळ्यांचे अनुदान एकूण ८ कोटी ५४ लाख १४ हजार रुपये संबंधित शेततळे घेतलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.-