शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

८१ गावांत मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण

By admin | Updated: December 5, 2015 09:08 IST

जागतिक मृदा दिवस व आंतरराष्ट्रीय माती वर्ष विशेष; आरोग्यदायक मातीची गरज.

सुधीर चेके पाटील /चिखली (जि. बुलडाणा): माती संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस आणि सन २0१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय माती वर्ष म्हणून जाहीर केले आहे. यानिमित्ताने मृद आरोग्य पत्रिका वितरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, बुलडाणा जिल्हय़ातील १३ तालुक्यांमधील ८१ गावांमध्ये मृद आरोग्य पत्रिका वितरण व तसेच शेतकर्‍यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. देशात कमी पाऊस व अधिक उष्णतामान असलेल्या भागात ओलीताच्या शेतीच्या माध्यमातून शे तकर्‍यांच्या समृद्धीची वाटचाल होत असनाच दुसरीकडे पाणी, रासायनिक खते, चुकीच्या पद्धतीने मशागत आदी कारणांमुळे दिवसेंदिवस जमिनीचा पोत बिघडत चालली आहे. महाराष्ट्रात जिराईत व बागायती क्षेत्रात सध्या ५0४ लाख हेक्टर क्षेत्रावरील क्षारयुक्ततेचा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील ही समस्या व्यवस्थापनेच्या दृष्टीने भीषणावह आहे. कारण ओलीताच्या क्षेत्रात प्रामुख्याने काळ्या खोल आणि भारी स्वरूपाच्या जमिनी असून, त्यांची निचर्‍याची क्षमता कमी आहे. या पार्श्‍वभूमीवर ह्यआरोग्यदायी जीवनासाठी, आरोग्यदायक मातीह्ण या उपक्रमांतर्गत राज्यातील १0 लाख शे तकर्‍यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण व जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने बुलडाणा जिल्हय़ातील १३ तालुक्यांमधील ८१ गावांमध्ये मृद आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात येणार आहेत. जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी व मृद तपासणीवर आधारित खतांच्या संतुलीत वापरास प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रमामध्ये निवडलेल्या गावातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहे.