खामगाव : महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ह्यलोकमतह्ण तर्फे आयोजित स्पोर्टस् बुक स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच लॉयन्स ज्ञानपीठ येथे करण्यात आले. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता क्रीडा जगताची धमाल घरबसल्या अनुभवा अशी आगळी वेगळी धमाल स्पर्धा इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्यांना लोकमततर्फे सन्मानित करण्यात आले.यामध्ये लॉयन्स ज्ञानपीठ शाळेची निकिता संजय काळे या विद्यार्थिनीला प्रथम बक्षीस पियानो, द्वितीय बक्षीस ट्रॉली बॅग शरयु बळीराम वानखडे वर्ग दुसरा, तर तृतीय बक्षीस अनुराग विजय माळीवाले याला देण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा जळगावकर, कळमकर, यांच्यासह शाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण
By admin | Updated: July 12, 2014 00:14 IST