शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ साहित्याचे वाटप चिखली गोडाउनमधूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:06 IST

चिखली : मोफत शिलाई मशीन आणि सायकल वाटपाच्या योजनेत चिखली तालुक्यातील लाभार्थ्यांची होत असलेली ससेहोलपट लोकमतने उजेडात आणल्यानंतर जि.प.महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले यांनी या साहित्य वाटपाबाबतच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.

ठळक मुद्देजि.प.सभापती महालेंनी घेतली लोकमतच्या वृत्ताची दखल

प्रभाव लोकमतचा लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : गरजू महिलांसाठी मोफत शिलाई मशीन आणि गरीब घरातील विद्यार्थिनींसाठी मोफत सायकल वाटपाच्या योजनेत चिखली तालुक्यातील लाभार्थ्यांची होत असलेली ससेहोलपट लोकमतने उजेडात आणल्यानंतर या बाबीची गंभीरतेने दखल घेऊन जि.प.महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले यांनी या साहित्याचे वाटप सिं.राजा, लोणार, मेहकर व दे.राजा येथील गोडाउन न देता चिखली येथूनच देण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.यासंदर्भाने महाले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये असे म्हटले आहे की, चिखली तालुक्यातील लाभार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने अनुदानावर देण्यात येणार्‍या शिलाई मशीन व सायकल यांचे वाटप तालुक्यातील गोडाउनमधूनच करण्यात येणार असून, त्याबाबतच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिल्या असल्याचे म्हटले आहे. यासोबतच सदरचे साहित्य हे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या कारकिर्दीतील खरेदी केलेल्या गोडाउनमध्ये तसेच पडून होते, हे विशेष. त्यांना आपल्या सबंध कारकिर्दीमध्ये या साहित्यासाठी लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार होऊ नये, याबाबत सखेद आश्‍चर्य व्यक्त केले आहे. शासनाच्या योजना जनतेसाठी राबविणे आवश्यक असताना वर्षानुवष्रे चुकीच्या पायंड्यामुळे या योजना लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी व आर्थिक भुर्दंडासह मनस्ताप देणारी असल्याची बाब गंभीर असून, याप्रकरणी दोषींवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे; मात्र यापुढे जनतेला शासकीय योजनेचा लाभ देताना तो वस्तु स्वरूपात न देता थेट त्यांच्या खात्यात रक्कमच जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांनी घेतला असून, ‘डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर’मुळे खरेदी -विक्रीतील भ्रष्टाचाराला आळा बसणार असल्याचे सांगून यापुढे लाभार्थ्यांना कोणत्याही कार्यालयामध्ये वारंवार चकरा मारण्याचे काम करावे लागणार नाही, याची ग्वाहीदेखील जि.प.सभापती महाले यांनी दिली आहे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकार